शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Kolhapur: पन्हाळ्यातील अकृषक आकारणीचे ११९ बोगस दाखले रद्द, चौकशीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:19 IST

कोल्हापूर : खोटी कागदपत्रे तयार करून केलेले अकृषक आकारणीचे तब्बल ११९ बोगस दाखले पन्हाळाच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी ...

कोल्हापूर : खोटी कागदपत्रे तयार करून केलेले अकृषक आकारणीचे तब्बल ११९ बोगस दाखले पन्हाळाच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी रद्द केले आहेत. गावठाण हद्दीपासून २०० मीटर क्षेत्रातील १३० दाखल्यांपैकी ६४ दाखले भूमिअभिलेख कार्यालयाने दिलेलेच नाहीत. १० दाखल्यांमध्ये गाव नकाशात गट नंबर दिसत नाही. खोट्या सह्या करून मिळवलेले ४५ दाखले रद्द केले आहेत. या आदेशाची संबंधितांच्या सातबारा पत्रकी नोंद करण्यात आली आहे. आता हे खोटे दाखले दिले कुणी, त्याचे काही रॅकेट आहे का आणि अन्य तालुक्यांतही असे दाखले दिले गेले आहेत का, याची चौकशी होण्याची गरज आहे.माले (ता. पन्हाळा) येथील सुहास बाबूराव पाटील यांनी ५ ऑगस्ट २०२३ रोजी विभागीय आयुक्तांकडे तत्कालीन पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांची कार्यालयीन चौकशी व्हावी असा तक्रार अर्ज दिला होता. त्यातून हा प्रकार उघडकीस आला. तहसीलदार शिंदे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ३० जानेवारीला पाठविलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.बहुतांशी प्रकरणात नागरिकांनी गावठाण हद्दीपासून २०० मीटर परीघ व झोनचे खोटे दाखले सादर करून अकृषक आकारणी दाखला मिळवला आहे.चलनाची रक्कम भरल्यानंतर कार्यालयाकडून दाखले देण्यात आले. त्यांची रजिस्टर नोंद ठेवली गेली. तक्रार अर्जानंतर तत्कालीन तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या काळात दिल्या गेलेल्या सर्वच दाखल्यांची पडताळणी केली. यात काही अर्जदारांनी खोटे दाखले दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते रद्द करून त्यांची नाेंद संबंधित गटाच्या सातबारा पत्रकी घेण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.खोट्या कागदपत्रांच्या आधारे तहसील कार्यालयाकडे अर्ज दाखल करून अकृषक आकारणी दाखला घेण्यासाठी अर्जदारांनी शासकीय अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणात शेंडगे यांना दोषी धरू नये व तक्रारदाराने त्यांच्या चौकशीचा केलेला अर्ज निकाली काढावा असा अहवाल तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी यांना दिला आहे.

कार्यालय : पडताळणीसाठी पाठवलेले अर्ज : कार्यालयाने दिलेले दाखले : कार्यालयाने न दिलेले दाखले : रद्द केलेले अर्जउपअधीक्षक भूमिअभिलेख : १३० : ५६ : ७४ : ६४सहायक संचालक नगररचना शाखा कोल्हापूर : ५२ : ०७ : ४५ : ४५एकूण : १८२ : ६३ : ११९ : १०९(१० प्रकरणात गाव नकाशात गट नंबर दिसत नाही.)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAgriculture Sectorशेती क्षेत्र