शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोल्हापूर महापालिकेचे ११५३ कोटी ९२ लाखांचे अंदाजपत्रक सादर; मुलभूत, पर्यावरणपूरक, नाविण्यपूर्ण योजनांना पाठबळ 

By भारत चव्हाण | Updated: March 23, 2023 16:24 IST

गेल्या अडीच वर्षापासून प्रशासकीय कारकीर्द

कोल्हापूर : नाविण्यपूर्ण योजनांना पाठबळ, पर्यावरणपूरक विकास कामांचा नियोजन, मुलभूत नागरी सुविधांसाठी असलेली जादा तरतुद, पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यावर दिलेला भर यासह समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असलेले कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०२३-२०२४ सालाचे ११५३ कोटी ९२ लाखाचे नवीन अंदाजपत्रक गुरुवारी  प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी उप समिती समोर सादर केले. या अंदाजपत्रकात हवा प्रदुषण, नदी प्रदुषण कमी करण्याचा तसेच काळम्मावाडी थेट पाईपलाईन ही महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.कोल्हापूर महापालिकेत गेल्या अडीच वर्षापासून प्रशासकीय कारकीर्द सुरु आहे. त्यामुळे गुरुवारी प्रशासक बलकवडे यांनी उपसमितीसमोर हे अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. गतवर्षी हाती घेतलेल्या कोटीतिर्थ तलाव संवर्धन, गळतीशोध मोहिम, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन दुसरा टप्पा, बहुमजली पार्कींग इमारत, अमृत अभियान १ मधील कामे आदी पूर्ण करण्याचा या आर्थिक वर्षात प्रशासनाचा प्रयत्न राहणार असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. नवीन प्रथमच शहरातील गळती रोखून त्यावर उपाययोजना करण्याकरिता पाण्याचे लेखापरीक्षण करण्याचा, शहरातील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचा, ईलेक्ट्रीक वाहनांसाठी ई चार्जींग सेंटर उभारण्याचा, हरितपट्टे विकसित करण्याचा संकल्प प्रशासनाने केल्याचेही बलकवडे यांनी सांगितले. महापालिकेचे सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसूली व भांडवली अपेक्षीत जमा ७५४ कोटी ४४ लाख असून विशेष प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी अपेक्षीत जमा ३३१ कोटी ५८ लाख तर महिला बाल कल्याण व केंद्रीय वित्त आयोगाकडून ६७ कोटी ९० लाख असे मिळून ११५३ कोटी ९२ लाख रुपये अपेक्षीत जमा दाखविण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBudgetअर्थसंकल्प 2023