कोल्हापूर : कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे २२ ऑक्टोबरपासून होणाऱ्या राष्ट्रीय लाठी तांत्रिक व पंच शिबीरासाठी कोल्हापूरच्या ११ जणींची निवड झाली. याबाबतचे पत्र लाठी स्पोर्टस ऑर्गनायझेशनकडून कोल्हापूर शाखेस गुरुवारी मिळाले.निवड झालेल्यांमध्ये वीणा वेरणेकर, रजनी चव्हाण, संगीता इंगळे, शीला पाटील, सायली शिंदे, नेहा खामकर, प्रियाली शिंदे, दीपाली कदम, अभयराजे पाटील, विद्या नाटेकर, प्रिती पालनकर यांचा समावेश आहे. या अकराजणींना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संभाजी चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
राष्ट्रीय लाठी तांत्रिक, पंच शिबीरासाठी कोल्हापूरच्या ११ जणींची निवड
By सचिन भोसले | Updated: October 19, 2023 18:20 IST