शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

राधानगरीतून १०००; अलमट्टीतून ३८,९२२ क्युसेक विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:28 IST

कोल्हापूर : राधानगरी धरणात २३१.४६ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून १०००, कोयनेतून ...

ठळक मुद्देराधानगरीतून १०००; अलमट्टीतून ३८,९२२ क्युसेक विसर्ग सुरूजिल्ह्यातील रूई व इचलकरंजी बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : राधानगरी धरणात २३१.४६ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून १०००, कोयनेतून २००० तर अलमट्टी धरणातून ३८,९२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील रूई व इचलकरंजी असे दोन बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात १०५.१५ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात १२३.०८१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा 

तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 77.52 दलघमी, कडवी 70.97 दलघमी, कुंभी 76.43 दलघमी, पाटगाव 105.17 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.410 दलघमी, जंगमहट्टी 34.651 दलघमी, घटप्रभा 44.050 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे. बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे 

राजाराम 14.9, सुर्वे 16.8 फूट, रुई 42.6 फूट, इचलकरंजी 39 फूट, तेरवाड 38.3 फूट, शिरोळ 31 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 17.6 फूट तर नजीकच्या सांगली 9 फूट व अंकली 9.9 फूट अशी आहे.प्रमुख जिल्हा मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरुकोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे प्रमुख जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. पन्हाळा तालुक्यातील केर्ली जोतिबा रस्ता खचल्याने गायमुख वळण मार्गे वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर