शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

१०० ‘सावकार’ पोलिसांच्या टेहळणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 11:11 IST

टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे १०० पेक्षा जास्त खासगी सावकारांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सावकारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत.

ठळक मुद्दे१०० ‘सावकार’ पोलिसांच्या टेहळणीतअर्ज दाखल : चौकशी सुरू झाल्याने धाबे दणाणले

एकनाथ पाटीलकोल्हापूर : टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे १०० पेक्षा जास्त खासगी सावकारांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सावकारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले आहेत.

संशयित सावकारांचे वार्षिक उत्पन्न आणि त्यापेक्षा जास्त असलेल्या मालमत्ता पडताळणीमध्ये निष्पन्न झाल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने सावकारांचे धाबे दणाणले आहेत.शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळांत बेकायदेशीर खासगी सावकारांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. सावकारांकडून गरीब, गरजू लोकांना मुलीचे लग्न, शिक्षण, घरबांधणीसह अन्य व्यवसायासाठी हजारो, लाखो रुपयांचे कर्ज दिले जात आहे. त्यानंतर व्याजासह मुद्दल देण्यासाठी सतावून सोडले जात आहे. गरीब लोकांच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत या सावकारांनी अनेकांची घरे, जमिनी व वाहने हडप केली आहेत.

दरमहा ५ ते १० टक्के व्याजदराने ते कर्ज पुरवितात; त्यामुळे मूळ कर्जापेक्षा त्याचे व्याज देताना कर्जदार हतबल होत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने नोंदणी असलेल्या सावकारांवर धाडी टाकल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर खासगी सावकारी करण्याची संख्या शेकडोपेक्षा जास्त आहे. त्यापैकी १०० पेक्षा जास्त सावकारांविरोधात अर्ज पोलिसांकडे दाखल झाले आहेत. प्रत्येक अर्जाची सखोल चौकशी सुरू आहे.

सावकाराचे वार्षिक उत्पन्न आणि त्याच्याकडे सध्या असलेली मालमत्ता यांची पडताळणी करून उत्पन्नापेक्षा वाढीव मालमत्ता निष्पन्न झाल्यास बेकायदेशीर सावकारी या अवैध व्यवसायातून मिळविलेली बेहिशेबी मालमत्ता म्हणून त्याच्यावर टाच आणली जाणार आहे. तसेच गुन्हे दाखल करून सावकारांना कारागृहाची हवा दाखविली जाणार आहे. ज्या सावकारांनी आपली मुले, नातेवाईक यांच्या नावावर मालमत्ता चढविली असेलच, त्यांनाही कारागृहाची हवा खावी लागणार आहे. सावकारीचे मूळ उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोट बांधली आहे.तक्रारींचा उगमशहरातील कावळा नाका, राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, विक्रमनगर, वारे वसाहत, संभाजीनगर, साने गुरुजी वसाहत, लक्षतीर्थ वसाहत, शिवाजी पेठ, बोंद्रेनगर, आर. के. नगर, सदर बझार यांसह ग्रामीण भागातील हुपरी, भुदरगड, गारगोटी, इचलकरंजी, जयसिंगपूर, शहापूर, शिरोळ, कागल, चंदगड, आजरा, कुडित्रे, सांगरुळ, वाकरे, बालिंगा, दिंडनेर्ली, कोडोली, सातवे, पन्हाळा, कळे, वडणगे, शिये, शिरोली एम. आय. डी. सी., गांधीनगर, वळिवडे, मुडशिंगी, गोकुळ शिरगाव, उचगाव, पाचगाव, आदी ठिकाणांहून १०० पेक्षा जास्त सावकारांविरोधात अर्ज दाखल झाले आहेत. पोलिसांकडून प्रत्येक अर्जाची कसून चौकशी सुरू आहे.

 

शहरासह उपनगर आणि गावात खासगी सावकार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा. सावकारांच्या धमकीला, दहशतीला बळी पडू नये, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.तिरूपती काकडे,अप्पर पोलीस अधीक्षक

जिल्ह्यातील खासगी सावकारी मोडून काढा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यानुसार रोज तीन-चार अर्जांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर