शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

शंभर ई-बसेसला अजून मंजुरीची प्रतीक्षा, कोल्हापूर महापालिकेकडून प्रस्ताव सादर 

By भीमगोंड देसाई | Updated: September 20, 2023 13:22 IST

केंद्र सरकारकडून मिळणार

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई-बस योजनेतून (पीएम ई-बस) शहरासाठी १०० ई बसेसचा प्रस्ताव महापालिकेने १० सप्टेंबरपूर्वीच राज्य शासनाकडे पाठवला आहे. मात्र अजून हा प्रस्ताव शासकीय पातळीवरच प्रलंबित आहे. यामुळे प्रवाशांच्या सेवेत रुजू होण्यास आणखी काही कालावधी लागेल असा, अंदाज महापालिका केएमटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.सध्या शहर आणि परिसरातील विविध मार्गावर सरासरी ७० केएमटी बसेस धावतात. अनेक बसेस आयुर्मान संपले आहेत तरीही प्रवाशाची गैरसोय होऊ नये, यासाठी ते रस्त्यावर आणले जात आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून घेतलेल्या बसेसपैकी अनेक बसेस नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठीही मोठा खर्च आहे. परिणामी केएमटीचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

प्रवासी संख्या जास्त असलेल्या मार्गावरही बसेस पुरेशा प्रमाणात नाहीत. प्रवाशांची गैरसोय होत आहे. वर्षानुवर्षे केएमटी तोट्यात आहे. यामुळे शासनाच्या मदतीशिवाय नवीन बसेस केएमटीच्या ताफ्यात येणे शक्य नाही. म्हणून महापालिकेने पीएम ई बस योजनेतून शहरासाठी १०० बसेस मिळावेत, असा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे.

यातील एका बसेसची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास आहे. पहिल्या टप्प्यात किमान काही बसेस तरी उपलब्ध झाल्या तर पर्यटकांसाठी या बस उपलब्ध करून देता येणार आहेत. यासाठी महापालिका प्रशासन पाठपुरावा करीत आहे. मात्र अजून शासनाकडून बसेससाठी हालचाली नाहीत.

खासदारांनी ताकद लावण्याची गरजकोल्हापूरसह अमरावती, भिवंडी, मालेगाव, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा, सांगली, सोलापूर, उल्हासनगर अशा पाच ते १० लाख लोकसंख्या असणारी शहरेही पीएम ई-बस योजनेतून बसे मिळण्यासाठी पात्र आहेत. योजना केंद्राची आहे. यामुळे प्राधान्याने कोल्हापूर शहरासाठी ई बसेस मिळण्यासाठी जिल्ह्यातील तिन्ही खासदारांनी राजकीय ताकद लावण्याची गरज आहे.

नऊमुळे आधार..आमदार स्थानिक विकास निधीतून आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या निधीतून नऊ वातानुकूलित बसेस प्रवाशाच्या सेवेत रूजू झाल्या आहेत. यामुळे केएमटीला आधार मिळाला आहे.

शंभर ई बसेस मिळाव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. शासनाकडून सूचना आल्यानंतर याचा डीपीआर तयार करण्यात येणार आहे. - केशव जाधव, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकार