शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

वरळी, ठाणे की कल्याण? आधी काय ते ठरवा! खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आदित्य यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 09:19 IST

डोंबिवलीत आगरी युथ फोरमतर्फे आयोजित आगरी महोत्सवात खा. शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपरोक्त उत्तर दिले.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : आदित्य ठाकरे यांनी वरळी, ठाणे की कल्याणमधून निवडणूक लढवायची ते अगोदर ठरवावे, असा टोला शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला. आदित्य हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. 

डोंबिवलीत आगरी युथ फोरमतर्फे आयोजित आगरी महोत्सवात खा. शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपरोक्त उत्तर दिले. आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह कल्याण उपजिल्हाप्रमुख  राजेश कदम, ठाणे माजी महापौर रमाकांत मढवी, पदाधिकारी सागर जेधे, संतोष चव्हाण, सागर दुबे आदी उपस्थित होते. खा. शिंदे म्हणाले, स्वप्न बघण्यामध्ये गैर काही नाही. ज्या कोणालाही कल्याण मतदारसंघातून उभे राहायचे आहे त्याने खुशाल उभे  राहिले पाहिजे. निवडणुकीत चुरस हवीच. पण, विरोधक चांगला पाहिजे; तरच लढाईला मजा येईल. कोण कुठून उभे राहणार याविषयी  रोजच उलटसुलट विधाने करीत राहायचे हे योग्य नाही. राजकारणात अशा गोष्टी चालत नाहीत. 

कामे छातीठोकपणे सांगू शकतो, मनसेला सुनावलेमनसेचे आमदार राजू पाटील यांनी इथल्या लोकप्रतिनिधींबद्दल सर्वसामान्यांमध्ये रोष असून, त्यांना बदल हवा आहे, असे वक्तव्य करीत अप्रत्यक्षरीत्या खा. शिंदे यांना लक्ष्य केले होते. याबाबत खा. शिंदे म्हणाले की,  माणूस जितकी कामे करतो तितकीच त्याच्यावर टीका होत असते. म्हणूनच आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही.   

मुख्यमंत्र्यांनी मुंबईची साफसफाई केलीमुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूरला विधीमंडळ अधिवेशन सुरू असताना पहाटे सहा वाजता मुंबईमध्ये येऊन मुंबईची साफसफाई केली. मुख्यमंत्री सध्या सखोल साफसफाई करीत आहेत. कारण मुंबईमध्ये खूप गाळ साचला होता. तो साफ करायची खूप गरज होती. मुख्यमंत्र्यांबरोबर सगळी जनता साफसफाईमध्ये सामील होईल. असेही खा. शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे