शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संसार उद्ध्वस्त, तो उभा करण्यासाठी मदत करा; सप्तशृंगीच्या रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 10:12 IST

त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था नूतन विद्यामंदिर शाळेत केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण :कल्याण पूर्वेतील चिकणी पाड्यातील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेमुळे बेघर झालेल्या रहिवाशांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली पालिकेला भेट देत आपल्या पुनर्वसनाची मागणी केली. आमचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. आम्हाला तो पुन्हा उभा करण्यासाठी मदत करा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. इमारतीतील ५० कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था नूतन विद्यामंदिर शाळेत केली आहे. 

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या सेक्रेटरी रेखा पाठारे यांनी सांगितले की, हा आमचा मोर्चा नाही. आम्ही पालिकेस निवेदन द्यायला आलो आहोत. दुर्घटनेनंतर पालिकेने आम्हा रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था नूतन विद्यामंदिर शाळेत केली. 

आता जून महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. शाळा प्रशासनाला पावसाळ्यापूर्वी शाळेची डागडुजी करावी लागते. त्यामुळे रहिवासी तेथे फार काळ राहू शकत नाहीत. आमच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली पाहिजे. 

मदतीची रक्कम लवकर द्यावी 

पाठारे पुढे म्हणाल्या, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली. ती रक्कम लवकर मिळावी. जे जखमी रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचार खर्चासाठी सरकारने मदत द्यावी, अशी आमची मागणी आहे. पालिका आयुक्त अभिनव गोयल हे कामानिमित्त बाहेर असल्याने रहिवाशांची अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याशी भेट झाली. आयुक्त गोयल शुक्रवारी दुपारी एक वाजता भेटतील, असे रहिवाशांना सांगण्यात आले.  

आपबिती सांगताना रडू कोसळले

आमचे पुनर्वसन केले पाहिजे. घटना घडली तेव्हा  आम्हाला १५ मिनिटांत घरातील पैसा, दागिने, कागदपत्रे काढण्यासाठी वेळ दिला होता. अनेक वर्षांचा मांडलेला संसार १५ मिनिटांत कसा बाहेर काढणार, असे त्या म्हणाल्या. आमच्या घरातील लोक मृत्युमुखी पडले. त्याला तिसरा दिवस झाला नाही तोच आम्ही घराबाहेर पडून पालिका गाठली आहे. हे सांगताना पाठारे यांना रडू कोसळले.  

टॅग्स :kalyanकल्याण