शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम मार्च 2022 अखेर पूर्ण होणार - श्रीकांत शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 14:43 IST

Shrikant Shinde : आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कळवा खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी केली.

कल्याण : मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या लेनचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरु असले तरी हे काम आत्ता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम येत्या मार्च 2022 अखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. 

आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कळवा खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी केली. त्याचबरोबर मुंब्रा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गाडीच्या गार्डच्या केबीनमध्ये बसून पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लेनच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी ही होते. त्याचबरोबर शिवसेनेचे पदाधिकारी रमेश म्हात्रे, सदानंद थरवळ, राजेश कदम आदी उपस्थित होते. 

खासदार शिंदे यांनी सांगितले की, पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लेनचे काम मार्गी लागल्यावर 25 ते 30 गाड्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत. या लेनच्या अभावी यापूर्वी एक एक्सप्रेस गाडीच्या मागे तीन लोकल गाड्यांचा खोळंबा होत होता. लेनचा विस्तार झाल्याने जलद गाड्यांसाठी दोन, स्लो गाड्यांसाठी दोन आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी दोन लेन उपलब्ध होतील. त्यामुळे रेल्वे गाडय़ांचा खोळंबा होणार नाही. त्याचा मोठा फायदा प्रवासी वाहतूकीसाठी मालवाहतूकीसाठी होणार आहे.

रेल्वे मार्गावर यापूर्वी ठाकूर्ली, आंबिवली, दिवा आणि कळवा खारेगाव येथे मॉन क्रॉसिंग होते. ठाकूर्ली आणि आंबिवली येथील मॅन क्रॉसिंग बंद करण्यात आले आहे. त्याठिकाणी पूल उभारले गेले. ते वाहतूकीसाठी खुले करण्यात आलेले आहे. खारेगाव येथील रेल्वे उड्डाणपूलाचे कामही येत्या दोन महिन्यात पूर्ण झाल्यावर खारेगावचे मॅन क्रॉसिंग बंद होईल. दिव्याचेही मॅन क्रॉसिंग बंद केले जाणार आहे. 

कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मची पाहणीही खासदारांनी यावेळी केली. कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाले असून त्याचा वापरही सुरु झाला आहे. काही छोटी मोठी कामे बाकी आहे विजेचे दिवे लावण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर अप्पर कोपरचा पूल अरुंद आहे. तो दुप्पटीने वाढविण्याचा प्रस्ताव आहे.

याशिवाय कोपर येथून कल्याण डोंबिवली महापालिकेचा रिंग रोड जात आहे. कोपर रेल्वे स्थानक ते रिंग रोडला कनेक्टीव्हीटी असलेला रस्ता तयार करण्याच्या सूचना यावेळी अधिकारी वर्गास खासदारांनी दिल्या आहे. त्याचाही विचार केला जाणार आहे. कोपर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म प्रमाणो दिवा स्थानकातील होम प्लॅटफार्म करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यात काही तांत्रिक अडचणी असल्या तरी त्या दूर करुन होम प्लॅटफार्म करण्यास रेल्वे अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखविली असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.  

टॅग्स :kalyanकल्याणcentral railwayमध्य रेल्वेShrikant Shindeश्रीकांत शिंदे