शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला उल्हास नदीचे सांडपाणी पाजणार का?; उल्हास नदी बचाव कृती समितीचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 07:04 IST

सर्वेक्षण करून प्रकल्प अहवालासाठी ६१ कोटी ५२ लाख ३० हजार १४६ रुपये खर्च येणार आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, असे कृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लिंगायत म्हणाले.

कल्याण - बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्याचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी स्थानिक लाेकप्रतिनिधींकडून केली जाते. मात्र, ती मान्य करणे दूरच, पण राज्य सरकारने उल्हास नदीचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी एक समिती नेमली आहे. यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

उल्हास नदीचे प्रदूषण आधी दूर करा, मग मराठवाड्याला पाणी वळते करा, अशा शब्दांत उल्हास नदी बचाव कृती समितीने सरकारच्या निर्णयाला विरोध केला.  नदीचे प्रदूषित पाणी मराठवाड्याला पाजणार का, असा सवालही त्यांनी विचारला विचारला. पश्चिम वाहिनी उल्हास नदी खोऱ्यातील ३४.८० टीएमसी, वैतरणा खोऱ्यातून १९.९० टीएमसी असे एकूण ५४.७० टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवणे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी समिती स्थापनेचा प्रस्ताव ठाणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांनी सादर केला होता.  त्यासाठी सर्वेक्षण करून प्रकल्प अहवालासाठी ६१ कोटी ५२ लाख ३० हजार १४६ रुपये खर्च येणार आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, असे कृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लिंगायत म्हणाले.

उल्हास नदी राजमाचीच्या डोंगरातून उगम पावते. उगमानंतर कर्जतपासून ती प्रदूषित होत जाते. ती कल्याण खाडीला येऊन मिळते. नदीपात्रात सांडपाणी आणि रसायन कंपन्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जाते.  नदीपात्रालगत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत.  त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नाकर्तेपणा 

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाकर्तेपणामुळे उल्हास नदी प्रदूषित झाली आणि तिला येऊन मिळणारी वालधुनी नदी मृत झाली. सरकारदरबारी पाठपुरावा करूनही नदीतील प्रदूषण दूर केले जात नाही. या नदीवर उदरनिर्वाह करणाऱ्या नदीकाठच्या लोकांचे काय? प्रदूषण दूर करण्यासाठी निधीची तरतूद न करता पाणी वळविण्यासाठी ६१ काेटी रुपयांची तरतूद करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उल्हास नदी बचाव कृती समितीने केला आहे.