शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोदींवर टीका करताना काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली, नंतर सावरून घेत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 22:56 IST

Congress News: भाषणा दरम्यान नेत्यांची अनेकदा बोलतांना जीभ घसरते. अशा घटना वारंवार होता. असा एक प्रकार डोंबिवलीत घडला.

कल्याण - भाषणा दरम्यान नेत्यांची अनेकदा बोलतांना जीभ घसरते. अशा घटना वारंवार होता. असा एक प्रकार डोंबिवलीत घडला. जिथे भाषणादरम्यान काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सवालाखे यांनी प्रियंका गांधी या नरेंद्र मोदी यांच्या संहारासाठी उतरल्या आहे असे भाष्य केले. नंतर त्यांना विचारले असता हा संहारसाठी उतरल्या आहे. लगेच त्यांना त्यांची चूक लक्षात येताच सत्तेच्या संहारासाठी उतरल्या आहेत असे असे सांगून सावरुन घेतले.

आज जागतिक महिला दिनानिमित्त कल्याण डोंबिवली शहर महिला काँग्रेस कमिटीतर्फे डोंबिवली ब्लॉक पदाधिकारी सुरेखा ठाकूर यांच्या वतीने महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रदेश महिलाध्यक्ष संध्या सव्वालाखे, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी,  काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी संतोष केणो, माजी नगरसेवक जितेंद्र भोईर हे उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी जोरदार भाषण केले. शेतकरी आत्महत्येवर बोलताना संध्या सव्वालाखे यांनी सांगितले की, पुरुष शेतक:यांनी आत्महत्या केली आहे. महिला देखील शेतकरी आहे. महिलांकडून पुरुषांनी शक्ती घेतली पाहिजे. त्यामुळे आत्महत्या थांबणार असे आवाहन केले.

यापुढे बोलताना सव्वालाखे यांनी सांगितेल की, प्रियंका गांधी यांनी लडकी हू लड सकती हू ही मोहिम राबविली जात आहे. प्रियंका गांधी या लढा देण्यासाठी आणि मोदींच्या संहारासाठी मैदानात उतरल्या आहेत असे विधानही त्यांनी केले. मात्र ज्यावेळी माध्यमांनी विचारले की, तुम्ही नरेंद्र मोदी संहारासंदर्भात बोलल्या आहात. त्यावेळी त्यांनी हो असे सांगितले. नंतर मी सत्तेच्या संहारा संदर्भात बोलली असे सांगून बाजू सावरुन घेतली.

दरम्यान डोंबिवलीत भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांच्याकडूनही जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात आले. महिलांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी यासाठी मान्यवरांच्या मार्गदर्शन आयोजित करुन जनजागृती करण्यात आली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkalyanकल्याणcongressकाँग्रेस