शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिथे शिवसेनेचा खासदार  तिथे निवडणूक लढविणार; डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 11:03 IST

बॅनर लावून कोणी खासदार होत नाही. प्रत्येकाला  इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचे दाैरे वाढल्यामुळे या मतदारसंघावर भाजप दावा करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे, तेथे शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक लढविणार, असे स्पष्टीकरण कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. 

भाजपने मिशन ४५ हे  लोकसभा निवडणुकीसाठी लक्ष्य ठेवले आहे. यात कल्याण आणि पालघर मतदारसंघांचा समावेश आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. ऑक्टाेबरपासून ठाकूर यांचे दाेन दाैरेही झाले आहेत. याबाबत सुरू असलेल्या चर्चांबाबत शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,  कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार, असे कोण म्हणाले? त्यांचे  नाव घ्या. भाजप नेत्यांच्या दाैऱ्यांमुळे आम्हाला काही त्रास नाही. प्रत्येक पक्षाला आपली संघटना बांधण्याचा अधिकार आहे. शिवसेनेचे खासदार असलेल्या ठिकाणी शिवसेनेचेच उमेदवार लढणार, हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. ठाकूर हे माझे मित्र आहेत, त्यांचे नेहमीच मी स्वागत केले आहे. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. डोंबिवलीतील पाटीदार भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा झाला. या प्रसंगी खासदार शिंदे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

बॅनर लावल्याने कोणी खासदार होत नाही?

कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे संपर्कप्रमख माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे बॅनर लावण्यात आले. राष्ट्रवादीने कल्याणची जागा ठाकरे गटाला सोडली आहे. यावर खासदार शिंदे यांनी सांगितले की, बॅनर लावून कोणी खासदार होत नाही. प्रत्येकाला  इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. 

माझे उत्तर कामातून असेल

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, माझ्यावर टीका करा. माझे उत्तर हे कामातून असेल. आम्ही कधी पातळी सोडलेली नाही. साेडणारही नाही. महाराष्ट्राची संस्कृती बिघडविण्याचे काम ते करीत असल्याची टीका खा. शिंदे यांनी केली.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShiv SenaशिवसेनाShrikant Shindeश्रीकांत शिंदे