शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खासदार, आयुक्त येणार समजताच KDMC यंत्रणा लागली कामाला; हॉस्पिटलबाहेरील कचऱ्याचा ढीग गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 15:45 IST

डोंबिवलीत खासदार आणि आयुक्त येणार असल्याचे समजताच शास्त्रीनगर  हॉस्पिटलच्या बाहेर असलेला कचरा  अखेर घाईघाईत आज उचलला गेला. 

मयुरी चव्हाण

डोंबिवली - वास्तविक कल्याण डोंबिवली शहरात काही प्रश्न हे गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थेच आहेत.पण मनात आल तर  प्राथमिक सोयीसुविधांच्या बाबतीत असलेल्या समस्या पटकन मार्गी लागु शकतात हे  डोंबिवलीत नुकतंच समोर आलंय. गेल्या काही दिवसांपासून  डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या बाहेर गेल्या अनेक दिवसांपासून कच-याचा ढीग होता. अगदी  सोमवारी सुद्धा या ठिकाणी कचरा असल्याचं लोकमतच्या कॅमेरात कैद झालं होतं. मात्र मंगळवारी  येथील कचरा उचलण्याचं काम जोरात सुरू होतं. हे ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसला असेल. 

मंगळवारी अचानक  खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी हे शास्त्रीनगर रुग्णालयात पाहणी करण्यासाठी येणार असल्याचं निश्चित झालं. आता दोन मोठ्या व्यक्ती येणार असल्यानं आजूबाजूचा परिसर हा स्वच्छच असलाच पाहिजे. मंगळवारी साडे अकरा वाजता खासदार शिंदे हे शास्त्रीनगर रुग्णालयात येणार होते. अगदी साडेअकरा होऊन गेले तरी रुग्णालयाबाहेरचा कचरा उचलण्याची लगीनघाई सुरू होती. यामुळे इच्छा तेथे मार्ग असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. रुग्णालयाबाहेरचा परिसर देखील स्वच्छ असणं आवश्यक आहे. कित्येक  दिवसांपासून  अगदी रस्त्याच्या बाजूला हा कचरा तसाच असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना  देखील त्रास सहन करावा लागत होता. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गत निवडणुकीत देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. तत्कालिन आयुक्त ई रवींद्रन  यांची पाहणी होणार असल्याच कळताच  फेरीवाल्याना उठविण्यात आलं होतं।आणि आता देखील खासदार आणि आयुक्तांच्या पाहणीमुळे अखेर हॉस्पिटलबाहेरचा कचरा उचलण्यात आला. त्यामुळे असे दौरे वारंवार  होत राहिले तर अनेक प्रश्न मार्गी लागतील अस म्हणणं वावग ठरणार नाही. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShrikant Shindeश्रीकांत शिंदेhospitalहॉस्पिटल