शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘त्या’ वस्तुस्थितीदर्शक अहवालाचे काय झाले?; जास्तीत जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 01:23 IST

काँग्रेस प्रभारींनी मागविला होता अहवाल : जास्त जागा मिळविण्याचा प्रयत्न

कल्याण : केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मार्चपासूनच तयारीला सुरुवात केली होती. ४ मार्चला मुंबईतील गांधी भवनमध्ये कल्याण-डोंबिवलीतील पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये विशेष बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविताना जास्तीतजास्त जागा आपल्या वाट्याला आल्या पाहिजेत, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर पक्षाचे कोकण विभाग प्रभारी बी.एन. संदीप यांनी वॉर्डनिहाय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार, अहवाल सादर झाला, पण ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.

राष्ट्रवादीच्या साथीने २००५ मध्ये केडीएमसीत अडीच वर्षे का होईना सत्तेत असलेल्या काँग्रेसची कालांतराने अधोगती झाली. १९९५ मध्ये १६, २००० मध्ये १८, २००५ मध्ये २१, २०१० ला १५, तर २०१५ च्या महापालिकेच्या निवडणुकीत तर अवघे चार नगरसेवक निवडून आले. मात्र, २०१९ ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीमुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवरही बळ मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांप्रमाणे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही महाविकास आघाडी म्हणून केडीएमसीची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महापालिकेची निवडणूक होणार होती. परंतु, कोरोनामुळे ती झाली नाही. परंतु, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये काँग्रेसची अंतर्गत बैठक झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून लढताना आपल्या पक्षाला जास्तीतजास्त जागा मिळाव्यात, असे मत जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी मांडले होते. या बैठकीत मांडलेल्या सूचना लक्षात घेता लवकरात लवकर वस्तुस्थितीदर्शक अहवाल द्यावा, जेणेकरून पुढील नियोजन करता येईल, अशा सूचना पक्षाचे कोकण प्रभारी संदीप यांनी केल्या होत्या. त्यावर अहवाल मार्चमध्ये सादर करण्यात आला, परंतु कोरोनामुळे या संदर्भातील कोणतीच कृती झालेली नाही. आता लवकरात लवकर त्या अहवालावर कृती व्हावी, अशी मागणी स्थानिक पातळीवरून होत आहे.

जिल्हाध्यक्षांनी याकडे वेधले होते लक्षमुस्लिमबहुल विभाग आणि २०१५ च्या निवडणुकीत शिवसेना जेथे दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशा जागा मिळाव्यात. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी, तर आरक्षण सोडतीनंतर पक्षातील प्रमुख नेत्यांचा भव्य मेळावा कल्याणमध्ये घ्यावा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे आंदोलन करण्यास मर्यादा आहेत. परंतु, पक्षातील १२ मंत्र्यांनी कल्याणमध्ये विशेष जनतादरबार घेऊन नागरिकांना भेडसावणारे स्थानिक समस्यांचे मुद्दे निकालात काढावेत, याकडेही पोटेंनी लक्ष वेधले होते.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना