शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

माय मराठीचं 'भूषण' ! कल्याणच्या पठ्ठ्याने बोलून नाही, 'करुन दाखविलं' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 14:51 IST

तरुणाच्या तक्रारीनंतर अनधिकृत हिंदी भाषेतील फलकावर कारवाई 

ठळक मुद्देकल्याण पश्चिमेकडील खडकपाडा चौक परिसरात एका राजकीय पक्षाने अनधिकृत बॅनर लावला होता. इतकेच नाही तर त्यावर हिंदी भाषेतून एक संदेश लिहिण्यात आला होता.

मयुरी चव्हाण  

कल्याण - कल्याणडोंबिवली शहर जसे अनधिकृत बांधकामामुळे कायम वादग्रस्त चर्चेत असते, त्याचप्रमाणे अनधिकृत फलकांचा मुद्दा देखील नेहमीच समोर आला आहे. मराठी भाषेविषयी असलेले प्रेम असो किंवा इतर शहरातील समस्यांवर प्रत्यक्ष कृती करण्यापेक्षा तरुणाई ही सोशल मीडियावर लांबलचक वाद घालून तो मुद्दा तिथेच सोडून देते. मात्र, कल्याणातील एका तरुणाने हिंदी भाषेत लावण्यात आलेल्या अनधिकृत फलकाची तक्रार करत तो हटविण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून केवळ "बोलून नाही" तर प्रत्यक्षात या तरुणाने "करुन दाखविलं" असंच म्हणावं लागेल.            कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा चौक परिसरात एका राजकीय पक्षाने अनधिकृत बॅनर लावला होता. इतकेच नाही तर त्यावर हिंदी भाषेतून एक संदेश लिहिण्यात आला होता. कल्याणमधील तरुण भूषण पवार यांने हा अनधिकृत फलक पाहिला आणि लागलीच याची कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन व इतर यंत्रणांकडे तक्रार केली. तक्रारीचा पाठपुरावा केल्याने हा अनधिकृत फलक तात्काळ केडीएमसीकडून हटविण्यात आला. या वृत्ताला ब प्रभाग क्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनीही दुजोरा दिला आहे. मराठी केवळ आपली मातृभाषा नाही तर आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. 

ज्या भाषेने आपल्या मुखात पहिला शब्द दिला तिला राज्यात दुय्यम स्थान भेटत आहे, इथे जन्माला आलेला तथा राज्यात वास्तव्यास असलेला प्रत्येक नागरिक हा मराठी भाषा संवर्धनासाठी पेटून उठला पाहिजे असे मत भूषण यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य कल्याण शहर समनव्यक म्हणून भूषण कार्यरत आहेत. दरम्यान, हा हिंदी भाषिक फलक भाजपा पक्षाकडून लावण्यात आला होता. त्यावर पश्चिम बंगालमधील सरकारवर टीका करण्यात आली होती. 

माय मराठीचा नेहमीच अभिमान

ऐतिहासिक कल्याण आणि सांस्कृतिक नगरी डोंबिवलीमध्ये मध्यमवर्गीय मराठी भाषिक वर्ग मोठ्या प्रमाणावर राहतोय. येथे मराठमोळे सणदेखील आजही पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात आहेत. यापूर्वी देखील शहरात मराठी अस्मितेचा मुद्दा अनेकदा समोर आला होता. मग, गुजराती भाषेत इमारतीला दिलेलं नाव असो की डोंबिवलीत आयोजित करण्यात एका क्रिकेट स्पर्धेत मराठी भाषिकांना करण्यात आलेली नो एन्ट्री असो. यावेळी सर्व स्तरातून तीव्र विरोध करण्यात आला होता. अखेर ही क्रिकेट स्पर्धा  रद्द करण्यात आली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाmarathiमराठीkalyanकल्याणdombivaliडोंबिवली