शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Vikram Gokhale : विक्रम गोखलेंचा अभिनय क्षेत्राला रामराम, यापुढे करणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 14:15 IST

गोखले पुढे म्हणाले की लोककला सादर करताना तुम्हाला त्यात मेहनत घ्यावी लागते. नृत्य, गोष्ट आणि विनोद सांगतानाही मेहनत लागते. तेच योग्य आहे. ते तुम्ही वास्तववादी नाटकांप्रमाणे करून चालणार नाही

कल्याण/मुंबई : त्रास करून घेण्याचे माझे वय नाही मी आता हळू हळू काम कमीच करत आहे. पण आता कुठेतरी थांबायला हवे अशा शब्दात ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले यांनी रविवारी आपल्या अभिनय क्षेत्रातील निवृत्तीचे सुतोवाच केले. आपण तरूण पिढीला मार्गदर्शन करीत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येथील सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेचे रविवारी दुसरे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी ऑनलाईन प्रणालीद्वारे गोखले यांनी संवाद साधला. 

गोखले पुढे म्हणाले की लोककला सादर करताना तुम्हाला त्यात मेहनत घ्यावी लागते. नृत्य, गोष्ट आणि विनोद सांगतानाही मेहनत लागते. तेच योग्य आहे. ते तुम्ही वास्तववादी नाटकांप्रमाणे करून चालणार नाही. परंतू त्या इतक्या मोठया कलेला आपण सध्या विसरूनच गेलो आहोत. या सगळयाचा कधी कधी त्रास होतो. त्रास करून घेण्याचे माझे वय नाही. मी आता काम हळुहळु कमीच करतोय. किती करायचे थांबायला पाहिजे ना कुठेतरी, मात्र मी शिकवितो ज्याला शिकण्याची इच्छा आहे त्यांना मी शिकवतो. जी शिकविण्याची शाळेची कॉलेजची पध्दत आहे त्याप्रमाणे मी शिकवतो. आपल्या गुरूंकडून पुस्तकांकडून मोठ मोठया लोकांकडून जे मिळाले ते सगळ पुढच्या पिढीला देणे महत्वाचे आहे, असेही गोखले म्हणाले. 

गोखलेंनी वाढत्या डिजीटलकरणावरही भाष्य केले. डिजीटलच्या लाटेत संवेदना हरवू देऊ नका. सामान्य माणसाची सुख दु:ख सोडून घरातील भांडण, नाचगाणी, बलात्कार, गुंडगिरी, राजकारणी एवढेच आपण सध्या बघू शकतो. समाजाची सुख दु:ख त्यावर भाष्य कोणी करीत नाही. डिजीटलकरणामुळे संवेदना आणि संवेदनशीलता दूर जात आहेत. पैसे कमाविण्याच्या नादात दर्जाहिन मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत. ज्याला काहीच अर्थ नाही  यात तुम्हाला काय मिळाले. अंतर्मुख करणारे सिनेमे, नाटक, मालिका बघणे आवश्यक आहे. मनोरंजनाचा हेतू साध्य होतोय का ते आधी ठरवा. 'घाल पीठ घाल पाणी' अशी सध्या मालिकांची अवस्था आहे. अशा भिकार मालिका बघणे तुम्हीच बंद करा अशा परखड शब्दात गोखले यांनी प्रेक्षकांना आवाहन केले.

महिलांना स्वातंत्र्य मिळाले नाही

देशाच्या स्वातंत्र्यानंतरही महिलांना पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नाही. तिला पुरूष प्रधान संस्कृतीशी भांडूनच आपला अधिकार मिळवावा लागत आहे. स्त्रीला तिचा हकक मिळालाच पाहिजे यासाठी माध्यमांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे गोखले म्हणाले.

मंजुळे यांचे कौतुक

कोरोनाकाळात विदारक चित्रण करणारी शॉर्ट फिल्म काढणा-या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे गोखले यांनी कौतुक केले. त्याच्याबरोबर काम करायला आवडेल असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेkalyanकल्याणNagraj Manjuleनागराज मंजुळेWomenमहिला