शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा भगवा हा भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचे वादग्रस्त विधान

By मुरलीधर भवार | Updated: January 10, 2023 17:53 IST

भाजपचा भगवा हा भोगाचे प्रतिक असल्याचे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. 

कल्याण : राज्यात शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. त्यात आणखीन एक वादग्रस्त विधान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज कल्याणमध्ये केले आहे. भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक असून भाजपाचा भगवा हा भोगाचे प्रतीक असे त्यांनी सांगितले. कल्याणमध्ये चव्हाण यांचा दौन दिवसीय दौरा आहे. कल्याणच्या चक्कीनाका येथून चव्हाण यांच्या उपस्थितीत जनसागर यात्रेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे चव्हाण यांनी हनुमान मंदिरात जाऊन आधी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर दौऱ्याला सुरुवात केली.

या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिरी ऋता आव्हाड, माया कटारीया, सारीका गायकवाड, मीनाक्षी अहिर, कुसुम गेडाम आदींचा सहभाग होता. यानंतर त्या पक्षाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला वर्गाशी संवाद साधणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता संघर्ष सोडविण्याचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मात्र, न्यायालयही दबावाखाली असल्याने तारीख पे तारीख दिली जात आहे अशी भावना जनतेच्या मनात बळावली असल्याचे प्रदेशाध्यक्षा चव्हाण यांनी सांगितले.  देशातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार पूर्णपणो अपयशी झाले .बेरोजगारी व महागाई या प्रश्नावरून लक्ष विचिलत करण्यासाठी नवनवीन मुद्दे उकरुन काढले जात आहेत.

भाजपचे हिंदुत्व पूर्णपणे ढोंगी आहे. त्यांना हिंदू धर्माचे काही पडलेले नाही. आमचे फक्त दोनच प्रश्न आहेत महागाई कमी झाली पाहिजे बेरोजगारी कमी झाली पाहिजे. छत्रपती संभाजी राजे आणि शिवाजी महाराज कोण होते हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. कोणता धर्म स्वीकारायचा ? कोणी कोणाची पूजा करायची? कुणी कुणासोबत लग्न करायचे हे आमचे वैयिक्तक प्रश्न आहे याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. केंद्रात त्यांची सत्ता असल्याने राज्यात हे असंविधानिक सरकार टिकून असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyan-pcकल्याणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा