शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पवईत घरकाम करणारी तरुणी वाशीला सापडली, १६ तासांच्या प्रयत्नांनंतर लागला घरच्यांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 05:29 IST

Vashi Station : मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान वाशी खाडी रेल्वे ब्रीजवर रेल्वे रुळालगत रक्ताच्या थारोळ्यात एक तरुणी बेशुद्ध पडली असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कल्याण : एक २१ वर्षीय तरुणी वाशी ब्रीज रेल्वे रुळाजवळ बेशुद्ध अवस्थेत रेल्वे पोलिसांना आढळली असून, ती १६ तास बेशुद्द होती. बेशुद्ध अवस्थेत तिने केवळ तीनच शब्द पुटपुटले व त्या आधारे कल्याण रेल्वे पोलिसांनी तिच्या आईवडिलांचा शोध लावला. ती पूर्ण शुद्धीत आल्यावर तिच्यासोबत काय घडले, ती वाशी रेल्वे ब्रीजवर कशी पोहोचली. तिला ठार मारण्याचा प्रयत्न कोणी केला, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान वाशी खाडी रेल्वे ब्रीजवर रेल्वे रुळालगत रक्ताच्या थारोळ्यात एक तरुणी बेशुद्ध पडली असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील तरुणीला तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. थोडी-फार शुद्धीवर आल्यावर तिने तिच्या आईचे व स्वत:चे नाव पुटपुटले. त्याचबरोबर, तिच्या तोंडातून टिटवाळा हा शब्द बाहेर पडला. या तीन शब्दांच्या आधारे रेल्वे पोलिसांना तिचा ठावठिकाणा शोधायचा होता. वाशी रेल्वे पोलिसांनी कल्याण रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल त्यांच्या पथकाने संपूर्ण टिटवाळा परिसर पिंजून काढला. १६ तासांनंतर रेल्वे पोलिसांनी तरुणीच्या घरचा पत्ता शोधून काढला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी