शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदी प्रदूषणाचे आंदोलन सरकारी पातळीवर बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:51 IST

यंत्रणांना सोयरसुतक नाही

कल्याण : उल्हास नदीचेप्रदूषण रोखण्यासाठी ‘मी कल्याणकर’ संस्थेच्यावतीने नदीपात्रात बुधवारपासून आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. हे आंदोलन सुरू होऊन २४ तास उलटूनही अद्याप सरकारी पातळीवर हे आंदोलन बेदखल आहे. नदी प्रदूषणाविषयी सरकारी यंत्रणांना काहीही पडलेले नाही. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणार तरी कोण, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.उल्हास नदीपात्रात मोहने, गाळेगाव आणि म्हारळमधून वाहत येणारा नाला थेट नदीला येऊन मिळतो. या नाल्यातील सांडपाणी कोणती प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषित होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी संस्थेच्यावतीने नितीन निकम यांच्यासह उमेश बोरगावकर, कैलास शिंदे यांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रदूषण रोखण्याविषयी ठोस तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. नदी पात्रातून कल्याण- डोंबिवली महापालिका, एमआयडीसी, स्टेम पाणी पुरवठा योजना, उल्हासनगर, बदलापूर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी उचलतात. या नदीचे प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करून प्रदूषण नियंत्रणात आणण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. ज्या संस्था पाणी उचलतात त्या नदीचे प्रदूषण रोखण्याविषयी गंभीर नाही, असा आरोप निकम यांनी केला आहे. सरकारी संस्थांना गांभीर्य नसेल तर नदीचे प्रदूषण रोखले कसे जाणार आणि कोण रोखणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. याआधीही निकम यांनी याच प्रश्नावर उपोषण केले होते. मात्र तेव्हा त्यांची समजूत काढून उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. पण तरीही प्रदूषणाचा प्रश्न निकाली लागलेला नाही.कारवाई मात्र शून्यप्रदूषणाची केवळ पाहणी होते; मात्र कारवाई शून्य. जलपर्णी काढण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. सगळ्य़ा सरकारी संस्थांनी संयुक्तरीत्या पावले उचलल्यास प्रदूषण रोखले जाऊ शकते. यापूर्वीही निकम यांनी उपोषण करून सरकारी यंत्रणांना जागे केले होते. आता पुन्हा आंदोलन सुरू केले असता, सरकारी यंत्रणांनी झोपेचे सोंग घेतले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी लक्ष घातल्यास हा प्रश्न सुटू शकतो, असे निकम म्हणाले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण