शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी साईनगर एक्स्प्रेसमध्ये सापडली दोन वर्षांची मुलगी; कल्याण रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल

By मुरलीधर भवार | Updated: June 7, 2024 17:51 IST

मुलीच्या आई-वडिलांचा शोध सुरू

मुरलीधर भवार, कल्याण: शिर्डी साईनगर एक्स्प्रेसमध्ये दोन वर्षांची मुलगी झोपलेल्या अवस्थेत आढळून आली. डब्यातील प्रवाशांना लक्षात येताच तिच्यासोबत कुणी आहे का, यांचा शोध घेऊनही कुणीही आढळून न आल्याने प्रवाशांनी याबाबत रेल्वेपोलिसांना माहिती दिली. रेल्वेपोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले. तिचा हात फ्रॅक्चर असल्याने रुग्णालयात तिच्यावर उपचार करून तिला बालगृहात पाठवण्यात आले. कल्याण रेल्वे पोलिसांनी या मुलीला कुणी तरी जाणीवपूर्वक एक्स्प्रेस गाडीत सोडून दिले असल्याचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.

बुधवारी दुपारच्या सुमारास शिर्डी साईनगर एक्स्प्रेसमध्ये काही प्रवाशांना दोन वर्षांची मुलगी एकटीच झोपली असल्याचे लक्षात आले. कल्याण रेल्वे स्थानकात हा प्रकार प्रवाशांना समजल्यानंतर प्रवाशांनी डब्यात विचारपूस करत तिच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला, मात्र कोणीच आढळून न आल्याने प्रवाशांना संशय आला. त्यांनी दादर येथे उतरून या दोन वर्षाच्या चिमुकलीला दादर रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. या मुलीवर उपचार करून रेल्वे पोलिसांनी तिला बालगृहात पाठवले. याप्रकरणी गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी या मुलीला एक्स्प्रेसमध्ये कोणीतरी जाणीवपूर्वक सोडून दिल्याचा संशय आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसkalyanकल्याण