शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

टेलर निघाला सराईत दुचाकी चोरच ११ मोटारसायकली जप्त, चोरताना मास्टर कीचा करायचा वापर

By प्रशांत माने | Updated: September 15, 2022 17:20 IST

डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगरमध्ये २ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी १२.३० या कालावधीत भरदिवसा सायकल चोरीचा गुन्हा घडला होता. याची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

डोंबिवली - एकिकडे शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना सायकलचोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना विष्णुनगर पोलिसांनी मोटारसायकल चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मास्टर की चा वापर करून दुचाकी चोरणारा चोर हा व्यवसायाने टेलर आहे. मोहम्मद इसाक युनुस खान (वय ५४)रा. आजदेपाडा, डोंबिवली पूर्व, असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील महाराष्ट्रनगरमध्ये २ सप्टेंबरला सकाळी ९ ते दुपारी १२.३० या कालावधीत भरदिवसा सायकल चोरीचा गुन्हा घडला होता. याची तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासकामी वरीष्ठ पोलीस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरिक्षक कुलदीप मोरे यांचे विशेष पथक नेमले होते. दरम्यान मंगळवारी गुप्त बातमीदारामार्फत पथकातील पोलीस शिपाई कुंदन भामरे यांना मिळालेल्या माहीतीवरून मोरे यांच्या पथकाने ठाकुर्ली पुर्वेकडील ९० फिट रस्ता येथून मोहम्मद खान याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस खाक्या दाखविताच त्याने सायकल चोरीच्या गुन्हयाची कबुली दिली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने विष्णुनगरमध्ये ३ , रामनगर ५ , टिळकनगरमध्ये १ आणि मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ अशा ११ मोटारसायकली मास्टर की चा वापर करून चोरल्याचे आणि त्यांची विक्री केल्याचे समोर आल्याची माहीती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.चोरीच्या गाड्या विकण्यासाठी लढवायचा शक्कल -चोरीच्या गाड्या विकण्यासाठी मोहम्मदने अनेकांना चुना लावला. एखादा पालखी सोहळा हेरून त्यात सहभागी असणाऱ्या लोकांशी ओळख काढून तो गोड गोड बोलायचा आणि  विश्वास संपादन करून त्यांना गाड्या विकायचा. डोंबिवलीमध्येच त्याने चोरीच्या गाड्या विक्री केल्या होत्या. या सर्व गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस