शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

उद्धव सेनेच्या उमेदवाराचा अर्ज भरण्याच्या रॅलीमुळे शहरात ट्रॅफिक जाम; डोंबिवलीकर वैतागले

By अनिकेत घमंडी | Updated: April 30, 2024 12:04 IST

सकाळी 10 वाजल्यापासून नेते आमदार आदित्य ठाकरे शहरात येणार असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क होती

डोंबिवली: कल्याण लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उद्धव सेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्या निवडणूक अर्ज भरण्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमुळे मंगळवारी इंदिरा गांधी चौकात ट्रॅफिक जाम झाला, त्यामुळे शेकडो डोंबिवलीकर नागरिक वैतागले.  आधीच उन्हाने पारा ४३ गाठला असल्याने वातावरण तप्त असताना कोंडी झाल्याने अडकून बसल्याने नागरिक हैराण झाले.

सकाळी 10 वाजल्यापासून नेते आमदार आदित्य ठाकरे शहरात येणार असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क होती, परंतु तरीही ते आल्यानंतर व्हायचा तो गोंधळ झालाच, वाहतूक कोंडी।झाली. भगतसिंग रस्ता, फते अली पथ, बाजीप्रभू चौक, केळकर पथ, मानपाडा, चिपळूणकर लेन असे सगळे रस्ते कोंडीत अडकले. राजकारण तुमचे तुम्ही करत बसा आम्हाला जाऊ द्या अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.रस्ते अडवून मिळवता काय असा टोला देखील लगावला, लोकप्रतिनिधी हे समस्या सोडवतात पण निवडणूक काळात यांच्या सभा, रॅली यामुळे कोंडीत अडकायला होते ते बरोबर नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.

आता हे आणखी काही दिवस असेच सुरू राहणार असेल तर वाहतूक नियमन पोलीस यंत्रणेने, मनपाने आरटीओने एकत्र येऊन पर्यायी मार्ग काढायला नको का असा सवालही विचारण्यात आला. सातत्याने गर्दी करायची आणि रस्ते अडवून धरायचे हे कोणत्या नियमात बसते. रॅली काढताना नियमावली कडक करा, नियम तोडणाऱयायांवर कारवाई करा पण नागरिकांना दिलासा द्या. मोठमोठ्या वाहनांनी आधीच रस्ते अडवून ठेवून चालता येत नाही हे राजकीय नेत्यांना शोभत का असा सवाल विचारण्यात आला.

टॅग्स :kalyan-pcकल्याणlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४