शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या चौघांपैकी तिघांना अटक; मुख्य आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 20:02 IST

६ लाख ९६ हजाराचा ५६७ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत.

प्रशांत माने/डोंबिवली लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: घरकाम करणा-या नोकराने आपल्या तीन साथदारांसह घरफोडी करून साडेपंधरा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २६ जुलैच्या मध्यरात्री घडली होती. या गुन्हयातील तीघांना अटक करण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे. मात्र मुख्य आरोपी असलेला नोकर सागर विश्वकर्मा उर्फ थापा. रा. नेपाळ हा अदयाप फरार आहे. अटक आरोपींकडून ६ लाख ९६ हजाराचा ५६७ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लीलबहादूर लालबहादूर कामी , टेकबहादूर जगबहादूर शाही, मनबहादूर रनबहादूर शाही अशी अटक आरोपींची नावे आहेत. सागर थापाने या साथीदारांच्या मदतीने तो नोकरी करत असलेल्या कुंदन हरिश्चंद्र म्हात्रे यांच्या घरात घरफोडी करून सोने चांदिचे दागिने, १० विविध कंपन्यांची घडयाळे आणि रोकड असा एकुण १५ लाख ५२ हजार ८०७ रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्हयाच्या तपासकामी वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे ) गहीनीनाथ गमे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलिस उपनिरीक्षक दिपविजय भवर, अमोल आंधळे यांसह अन्य पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचे पथक नेमले होते. कुंदन म्हात्रे यांच्या घरी काम करणारा नोकर सागर थापा हा घटनेनंतर बेपत्ता झाला होता. त्यामुळे तो संशयाच्या घे-यात सापडला. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेरांचा आधार घेतला असता चोरीच्या घटनेच्या दिवशी एकजण रिक्षा पकडून शीळफाट्याच्या दिशेने निघुन गेल्याचे दिसून आले. पोलिसांचे पथक शीळफाट्याला पोहचले. शीळ फाट्याच्या रिक्षा स्टॅण्डवर त्यांनी तेथील रिक्षा चालकांना सागर थापाचे फाेटो दाखविले. त्यावेळी एका रिक्षा चालकाने प्रवाशी म्हणून सागरला नवी मुंबईतील कामोठे येथे सोडल्याची माहिती दिली.

पोलिसांनी सागरचे घर शोधले परंतू त्याठिकाणी तो नव्हता. पोहचले. त्या घरात राहणा-या लील बहाद्दूर कामी याच्याकडे चौकशी करता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्याच्याकडे सखोल चौकशी करता सागर हा त्याचा मेहुणा असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात पुढे सागरच्या मदतीनेच लीलबहाद्दूरने टेकबहाद्दूर आणि मनबहाद्दूर यांच्यासह कुंदन म्हात्रे यांच्या घरात चोरी केल्याचे उघड झाले. लील बहाद्दूर याच्या वसई आणि तेलंगणा येथे तीन घरफोडीचे गुन्हे दाखल असून सागरचा शोध सुरू असल्याची माहीती पोलिसांनी दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली