शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीमध्ये येत्या 15 दिवसांत कडक लॉकडाऊन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 18:48 IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र काही नागरिक अजूनही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र काही नागरिक अजूनही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीने आणखीन कडक पाऊल उचलली आहे. रस्त्यावर सबळ कारणाशिवाय फिरणाऱ्या नागरीकांना आता अँन्टीजन टेस्ट केंद्रावर नेऊन त्यांची  टेस्ट करण्यात यावी  असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. तसेच येत्या 15 दिवसात केडीएमसी हद्दीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्तांनी पोलिसांना निर्देश  दिले आहेत. येत्या 15 दिवसात  लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याबाबत आज सकाळी, पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झालेल्या आढावा बैठकीत आयुक्तांनी हे निर्देश दिले . कल्याण व डोंबिवली येथे असलेल्या नाकाबंदी पॉईंटवर गर्दी नियंत्रित केली पाहिजे. काही नागरिक विनाकारण गर्दी करतात तेथे पोलिसांनी सक्त भूमिका घ्यावी, पहिल्या लॉकडाऊन सारखेच क़डक काम करावे अशा सूचना पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी या बैठकित दिल्या. त्यावर  सबळ कारणाशिवाय रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची यापुढे कल्याण मध्ये जुने महात्मा फुले पोलिस स्टेशन, तहसील कार्यालयाजवळ  व डोंबिवलीत रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी अँन्टीजन टेस्ट  केली जावी व त्यासाठी ॲम्बुलन्स ची सुविधा उपलब्ध करावी अशा सूचना आयुक्त सूर्यवंशी यांनी आरोग्य विभाग व प्रभाग क्षेत्र अधिका-यांना दिल्या.   सकाळी  11 नंतर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात पाहणी करावी आणि पाहणी करताना जनजागृतीसाठी मेगा फोनद्वारे अनाउन्समेंट चालू ठेवावी.  वाईन्स च्या दुकानात गर्दी दिसून येत असल्याबाबत तसेच रात्री उशिरा आईस्क्रीम पार्लर चालू असल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत, याचीही पाहणी करून तेथे नियंत्रण ठेवावे अशा सूचना  देखील आयुक्तांनी  यावेळी दिल्या. अंतर्गत भागात गर्दीची पाहणी करण्यासाठी आवश्यक भासल्यास ड्रोन चा वापर करावा असेही निर्देश पालिका आयुक्तांनी सर्व विभागीय उपायुक्तांना दिले. लक्ष्मी मार्केट, एपीएमसी मार्केट या ठिकाणी सकाळी खूप गर्दी होते अशा सूचना पोलिसांकडून प्राप्त होताच एपीएमसी मार्केट मधील गर्दी कमी करण्याचे पोलीस आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी नियोजन करावे त्याच प्रमाणे लक्ष्मी मार्केटमध्ये जास्त गर्दी दिसून येत असेल ते मार्केट बंद करून पूर्वीप्रमाणे भाजी मार्केट चे नियोजन अन्य विविध ठिकाणी करण्याबाबत विचार केला जाईल असेही आयुक्त म्हणाले. सकाळी 11  नंतर भाजीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले फिरताना दिसले तर त्यावर कठोर कारवाई करावी तसेच  रेस्टॉरंट मध्ये केवळ पार्सल सुविधा चालू ठेवाव्यात, गर्दी दिसली तर सदर रेस्टॉरंट सील करण्याची कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस