शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

युतीची कुंडली जुळल्याखेरीज उमेदवारांची यादी नाही; शिंदेसेनेची केडीएमसीत भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:59 IST

इच्छुक उमेदवाराचा प्रभागातील जनसंपर्क, त्याने केलेली कामे आणि त्याची निवडून येण्याची क्षमता, या गोष्टी विचारात घेऊन संबंधित इच्छुकाला उमेदवारी द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कल्याण-डाेंबिवली महापालिका निवडणुकीत महायुती करण्याविषयी वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे. ही बोलणी होऊन जागा वाटपाचा निर्णय झाल्यावरच शिंदेसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी मंगळवारी दिली. डोंबिवली पूर्व पश्चिमेतून शिंदेसेनेकडून ५५० उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. या उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी घेण्यात आल्या.

इच्छुक उमेदवाराचा प्रभागातील जनसंपर्क, त्याने केलेली कामे आणि त्याची निवडून येण्याची क्षमता, या गोष्टी विचारात घेऊन संबंधित इच्छुकाला उमेदवारी द्यायची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. शिंदेसेनेच्या उमेदवारांची यादी पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंंदे हे जाहीर करणार आहेत. तत्पूर्वी महायुतीबाबत चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्याचा निर्णय अपेक्षित आहे. महायुती झाल्यावर कोणी किती जागा लढवायच्या याचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

उमेदवारांच्या मुलाखती जिल्हाप्रमुख लांडगे यांनी घेतल्या. त्यांच्यासोबत पक्षाचे पदाधिकारी भाऊ चौधरी, अरुण आशाण आदी उपस्थित होते. मुलाखतीसाठी इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. मुलाखती पार पडल्या असल्या तरी आत्ता उमेदवारांच्या यादीत नाव येणार की नाही ?, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. हातात दिवस कमी असल्याने इच्छुकांची धाकधूक अद्याप कायम आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेतील शिंदेसेनेच्या इच्छुकांच्या मुलाखती उद्या बुधवारी घेतल्या जाणार होत्या. काही कारणास्तव त्या आज होऊ शकल्या नाहीत.

तुम्ही प्रभागात फिरता का ?मुलाखतीच्या वेळी काही इच्छुकांना तुम्ही प्रभागात फिरता का ? हा प्रश्न विचारला गेला. इच्छुकांनी होकारार्थी उत्तर दिल्यावर लांडगे यांनी तुम्ही प्रभागात फिरत नाही, असे सांगताच काही इच्छुकांची भंबेरी उडाली. अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकीत शिंदेसेनेचा ज्या प्रभागात पराभव झाला. त्या प्रभागातील उमेदवार हे त्यांच्या प्रभागापुरता विचार करीत होते. मात्र, महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय असल्याने चारही सदस्यांनी एकत्रित फिरून प्रचार करावा, अशी सूचना इच्छुकांना केली.

मुलाखत घेणाऱ्यांचा वडापाववर तावइच्छुकांची संख्या जास्त असल्याने प्रत्येक पॅनलमधील चार सदस्यांची मुलाखत घेतली जात होती. मुलाखती लांबल्याने मुलाखत घेणाऱ्यांना जोराची भूक लागली. त्यांना वडापाव मागवला. गरमागरम चहासोबत वडापाव खाल्ल्यावर पुन्हा मुलाखती सुरू केल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance talks first, then KDMC candidate list: Shinde Sena's stance.

Web Summary : Shinde Sena will announce KDMC candidates after alliance talks conclude. Interviews for 550 aspirants are underway, focusing on public relations and electability. Final list depends on alliance decisions.
टॅग्स :Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६