शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात वाहून गेलेल्या चिमुरड्या रिषिकाची दुर्दैवी कहाणी, जन्मापासून शारीरिक दोषांनी त्रस्त

By नितीन पंडित | Updated: July 21, 2023 09:59 IST

नाल्यात पडून गेली वाहून : वाडिया इस्पितळात दहाव्या दिवसापासून सुरू होते उपचार

नितीन पंडितभिवंडी : ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान नाल्यात पडलेल्या रिषिका रुमाल (६ महिने) हिला जन्मापासून शौचाच्या ठिकाणी जागेचा विकार असल्याने तिच्यावर दहाव्या दिवसापासून मुंबईतील वाडिया इस्पितळात उपचार सुरू होते. बुधवारी त्याच उपचारासाठी या तान्हुलीला घेऊन तिचे आजोबा व आई गेले होते. परत येताना पावसाने रेल्वेसेवेला फटका बसल्याने त्यांनी रेल्वे मार्गावर उतरून प्रवास सुरू केला. पावसापासून नातीचे संरक्षण व्हावे म्हणून आजोबांनी तिला रेनकोटमध्ये घेतले होते. मात्र, अचानक त्यातून ती निसटली आणि नाल्यात पडली. 

दुर्दैवी रिषिकाची आई योगिता ही भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील राहणारी आहे. पाच ते सहा महिन्यांची ही मुलगी असून तिचे नाव रिषिका ठेवण्यात आले होते. मात्र, तिचे बारसे केलेले नव्हते. त्यामुळे काही जण तिला दर्शिका या नावानेही हाक मारत होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता शंकर रुमाल या बाळंतपणासाठी हैदराबाद येथून आपल्या माहेरी भिवंडीत आल्या होत्या. बुधवारी तिच्या नियमित तपासणीसाठी योगिता आपले वडील ज्ञानेश्वर पोंगुल यांच्या सोबत मुंबईला गेली होती. जाताना ते गाडीने गेले होते, स्टेशनवर दुपारी गर्दी नसल्याने मुंबईहून अंबरनाथ लोकलने ठाकुर्लीपर्यंत आले. कल्याण स्थानकात उतरून त्यांना भिवंडीला जायचे होते. मात्र, मुसळधार पावसाने रेल्वे सेवा बंद झाल्याने योगिता, वडील ज्ञानेश्वर हे चिमुकल्या रिषिकाला घेऊन रेल्वेमार्गातून चालत निघाले होते .

२० तास शोधले, गुरुवारी शोधकार्य थांबविले 

डोंबिवली : ठाकुर्लीच्या पुढे पत्रिपुलानजीकच्या नाल्यात मंगळवारी दुपारी रिषिका पडल्यानंतर तब्बल २० तास खाडीपात्रात तिचा शोध सुरू होता. मात्र, गुरुवारी संध्याकाळपर्यंत तिचा शोध न लागल्याने अखेर एनडीआरएफने शोधकार्य थांबवले.

डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, त्या बाळाचा शोध कार्य बुधवारी रात्री उशिरापर्यंत अग्निशमन यंत्रणा, एनडीआरएफ, लोहमार्ग पोलिसांमार्फत सुरू होते. गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पुन्हा वेगवेगळ्या यंत्रणांनी शोध घेतला. कल्याण, डोंबिवली, भिवंडीकडील खाडी किनारा तसेच मुंब्रापर्यंत शोध घेतला. मात्र, रिषिकाचा ठावठिकाणी लागला नाही.

 एनडीआरएफचे २३ अधिकारी, कर्मचारी या शोध मोहिमेत सहभागी होते. दोन बोटींमधून त्यांनी शोध घेतला. लोहमार्ग पोलिसांनीही डोंबिवली, ठाकुर्ली भागात तीन तास शोध घेतला; अग्निशमन दलाच्या एका पथकाने मुंब्रा खाडीपर्यंत जाऊन शोध घेतला. लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, एनडीआरएफ युनिटचे योगेशकुमार शर्मा यासह अग्निशमन यंत्रणेचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू होते.

 कचोरे येथील ग्रामस्थांनी देखील शोधकार्यात मदत केली, बाळ पाण्यात पडल्याचे समजल्यापासून त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. 

एनडीआरएफ यंत्रणेसोबत मी स्वतः  सकाळपासून तीन तास घटनास्थळापासून डोंबिवली खाडी परिसरात बाळाला शोधायला गेले होते. तीन तास खाडी किनाऱ्यावरील गाळ, झाडी, कांदळवन, वनस्पती यात पाहणी केली. दुपारी ४ पर्यंत तरी शोध लागलेला नव्हता.- अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डोंबिवली लोहमार्ग.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीlocalलोकलRainपाऊसfloodपूर