शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील मनसेच्या शाखेवर कारवाईसाठी गेलेले केडीएमसीचे पथक माघारी परतले, कारण...

By मुरलीधर भवार | Updated: August 8, 2024 20:09 IST

मनसेच्या पदाधिकाऱ्याने विरोध केल्याने कारवाई पथकाला कारवाई न करताच रिकाम्या हाती परतावे लागले.

मुरलीधर भवार, कल्याण : शहराच्या पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरातील म्हसोबा चौकानजीक असलेल्या मनसेच्या शाखेवर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापलिकेचे पथक पोहचले. मात्र या कारवाईस मनसेच्या पदाधिकाऱ्याने विरोध केल्याने कारवाई पथकाला कारवाई न करताच रिकाम्या हाती परतावे लागले.

कोळसेवाडी परिसरात मनसेची शाखा आहे. त्याठिकाणी मनसेने अतिक्रमण केलेले नाही. शाखेत ज्येष्ठ नागरीकांकरीता बसण्यासाठी कट्टा आहे. या शाखेवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे कारवाई पथक आज सायंकाळी आले. ही माहिती कळताच मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी कारवाईस विरोध केला. गव्हाणे यांनी सांगितले की, मनसेची शाखेचा कोणाला अडसर नाही. याच शाखेच्या मागच्या बाजूला अन्य काही बेकायदेशीर गोष्टी उभ्या ठाकल्या आहेत. त्यावर महापालिकेचा जेसीबी चालविला जात नाही. मनसेच्या शाखेला प्रशासन कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या सांगण्यावरुन लक्ष्य करीत आहे. त्या विरोधात महापालिका आयुक्तांनी आधी कारवाई करावी. कोणाच्या तरी सांगण्यावरुन मनसेच्या शाखेला लक्ष्य केले जात असल्यास मनसे प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा गव्हाणे यांनी दिला आहे.

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी सांगितले की, आम्ही मनसे शाखेवर कारवाई करण्यासाठी गेलो नव्हतो. त्याठिकाणी असलेल्या बेकायदा शेडवर कारवाई करणार होतो. आज विराेध झाल्याने ही कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणMNSमनसे