शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दर दिवसाला आकारला जाणारा ५० रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:00 IST

महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेची कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक

कल्याण-ज्या रिक्षा चालाकांनी विहित वेळेत रिक्षाची पासिंग केली नाही. त्यांना आरटीओ कार्यालयाकूडन दर दिवसाला ५० रुपये दंड आकारला जातो. या जाचक दंड रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज उद्धव सेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेने आरटीओ कार्यालयावर धडक दिली. हा जाचक दंड रद्द केला नाही. तर सर्व वाहने आरटीओ कार्यालयात आणू उभी केली जातील. तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा सेनेचे अध्यक्ष निलेश भोर यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे.

भोर यांनी आज आरटीओ अधिकारी अशुतोष बारकूल यांची भेट घेतली. त्यांना रिक्षा चालकांच्या मागणीचे निवेदन सादर केले. रिक्षा चालकांनी पाेटाला चिमटा काढून तसेच काही वित्त संस्थांकडून कर्ज घेतले आहे. कोरोना काळात रिक्षा चालकांची हालत खूपच खराब होती. त्यांना कोणतीही मदत सरकारकडून मिळाली नाही. कोरोनानंतर आत्ता कुठे रिक्षा चालक आर्थिक विवंचनेतून थोडाफार सावरत आहे. रिक्षाचे पासिंग आरटीओकडून दरवर्षी करणे बंधनकारक आहे. मात्र ज्या रिक्षा चालकांकडून पासिंगला विलंब होतो. त्यांना त्यांना दर दिवसाला ५० रुपये दंड आकारला जातो. रिक्षा चालकांची स्वत:ची गाडी असली तरी त्याला दिवसभर रिक्षा चालवून पैसे सुटत नाहीत. त्यात इंधन महाग झाले आहे. शाळा सुरु झाल्या असल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे.

या सगळ्या समस्या पाहता रिक्षा चालकांना दर दिवसाला ५० रुपये दंड आकारणे कितपत योग्य आहे ? असा सवाल भोर यांनी उपस्थित केला आहे. दर दिवसाला आकारला जाणारा ५० रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा अशी मागणी भोर यांनी आरटीओ अधिकारी बारकूल यांच्याकडे केली आहे हा दंड रद्द केला नाही तर ज्यांना दंड आकारला आहे. ती सर्व वाहने आरटीओ कार्यालयासमोरील आवारात आणून उभी करुन ठेवली जातील. या प्रकारचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भोर यांनी दिला आहे.