शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

ठाकरे-शिंदे समर्थकांमध्ये डोंबिवली शहर शाखेत बाचाबाची, धक्काबुक्की?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 14:58 IST

मध्यवर्ती शिवसेना शाखा ही शिवसैनिकांची असून, शिंदे समर्थकांनी त्यावर हक्क सांगायचा नाही, अशी भूमिका शिवसेना शहर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली.

डोंबिवली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी सोमवारी एकनाथ शिंदे समर्थकांना मध्यवर्ती शहर शाखेत प्रवेश करण्यापासून रोखण्याची भूमिका घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांचे चार फोटो काढले. यामुळे ठाकरे व शिंदे समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक व धक्काबुक्की झाली. यामुळे डोंबिवलीमधील वातावरण तंग झाले होते.

मध्यवर्ती शिवसेना शाखा ही शिवसैनिकांची असून, शिंदे समर्थकांनी त्यावर हक्क सांगायचा नाही, अशी भूमिका शिवसेना शहर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. जे शिवसेनेचे प्राथमिक सदस्यही नाहीत, त्यांनी इथे येऊन हक्क सांगण्याची भाषा करू नये. आधी इथून निघून जावे, असा पवित्रा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने शहर शाखेतील वातावरण तापले व तणाव वाढला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास डोंबिवली शहर शाखेत शिंदे समर्थक राजेश कदम, योगेश जुईकर आणि अन्य दोघे जण गेले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले उपशहर प्रमुख विवेक खामकर यांनी त्यांना कार्यालयात बसण्यास विरोध केला व बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे गोंधळ झाला, बाचाबाची, धक्काबुक्की झाली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनीही या घटनेस दुजोरा दिला.

कल्याण - डोंबिवली महानगर संघटक वैशाली दरेकर, विधानसभा संघटक कविता गावंडे, शहर संघटक मंगला सुळे, किरण मोंडकर, शिल्पा मोरे, सीमा आयर, ममता घाडीगावकर, प्रकाश तेलगोटे, श्याम चौगुले, अभय घाडीगावकर आदींनी शिंदे समर्थकांना मध्यवर्ती शाखेत प्रवेश करण्यापासून रोखले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून शिंदे समर्थकांना बाहेर काढले. तेव्हा उपस्थित स्त्री - पुरुष शिवसैनिकांनी ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत एकनाथ शिंदे व श्रीकांत शिंदे यांचे फाेटाे उतरवले.

सीसी कॅमेरे फुटेज बंद करण्यात आले?ठाकरे व शिंदे समर्थकांत बाचाबाची, धक्काबुक्की सुरु होताच शहर शाखेतील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बंद करण्यात आले. या कॅमेऱ्याचे फुटेज माध्यमांच्या हाती लागू नये, याची खबरदारी घेताना असे काही घडलेच नाही, असे दोन्ही बाजूकडून भासवले जाऊ लागले. खा. शिंदे यांचे काम करणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करू द्यावे. त्यांना काहीही होणार नाही, अशी भूमिका ठाकरे समर्थकांनी घेतली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे