शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले दुर्गाडीवर नवरात्रोत्सव साजरा करण्यास ठाकरे गटाला नाकारली परवानगी

By मुरलीधर भवार | Updated: October 13, 2023 20:39 IST

किल्ले दुर्गाडी ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू असल्याने ताबा जिल्हाधिकाऱ्यांकडे

मुरलीधर भवार-कल्याणकल्याणच्या ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाप्रमाणेच ठाकरे गटाने जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली होती. मात्र अप्पर जिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी संयुक्तीक कारण न देता ठाकरे गटाला उत्सव साजरा करण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे किल्ले दुर्गाडीवर शिवसेना शिंदे गटाकडून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी ठाकरे गटाचे कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे यांनी पोलिस प्रशासनासह टाणे जिल्हाअधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. ही परवानगी नाकारता अप्पर जिल्हाधिकारी परदेशी यांनी म्हटले आहे की, त्याठिकाणी विजेची रोषणाई करणे, मंडप उभारणे, रंगरंगोटी करणे याची परवानगी ठाकरे गटाने मागितली होती. मात्र ही कामे आधीच केली गेली असल्याने त्याठिकाणी ही कामे करता येणार नाही. त्यामुळे ही कामे करण्याची परवानगी नाकारली आहे. ठाकरे गटाने म्हटले आहे, अप्पर जिल्हाधिकारी परदेशी यांनी परवानगी नाकारता संयुक्तिक कारण दिलेले नाही.

किल्ले दुर्गाडी ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू आहे. तिचा ताबा जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून परवानगी दिली जाते. परवानगीकरता ठाकरे गटाचे शहर प्रमुख बासरे यांनी २५ सप्टेंबर रोजी पोलिस प्रशासनासह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यांना परवानगी देण्यासाठी जो पोलिस प्रशासनाचा अहवाल तयार केला. त्याचा संदर्भ देताना १३ आ’क्टोबरचा संदर्भ दिला आहे. २५ सप्टेंबरपासून पोलिस प्रशासन काय करीत होते असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्याचबरोबरमागच्या वर्षीही ठाकरे गटाकडून किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली गेली होती. तेव्हा आमदार विश्वनाथ भोईर हे शहर प्रमुख पदी होते. परंपरेनुसार किल्ले दुर्गाडीवर उत्सव करण्याची परवानगी शहर प्रमुखास दिली जाते. मात्र या वेळेस शहर प्रमुख रवी पाटील आहे. त्यामुळे मागच्या वर्षीचे कारण आणि यंदाचे वर्षीचे परवानगी नाकारण्याचे कारण कोणत्याही प्रकारे सुसंगत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीkalyanकल्याणShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे