दहावे आश्चर्य डोंबिवलीत! मुख्यमंत्र्यांनी पलावा जंक्शनला भेट द्यावी: राजू पाटील

By मुरलीधर भवार | Published: April 10, 2024 04:25 PM2024-04-10T16:25:41+5:302024-04-10T16:28:35+5:30

राजू पाटील यांचे ट्वीट

tenth wonder in dombivli cm eknath shinde should visit palava junction said raju patil | दहावे आश्चर्य डोंबिवलीत! मुख्यमंत्र्यांनी पलावा जंक्शनला भेट द्यावी: राजू पाटील

दहावे आश्चर्य डोंबिवलीत! मुख्यमंत्र्यांनी पलावा जंक्शनला भेट द्यावी: राजू पाटील

मुरलीधर भवार, डोंबिवली- रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी एमएमआरडीए आणि केडीएमसीने पुलाचे आरेखन बदलले आहे. हे दहावे आश्चर्य पाहण्यासाठी  एकदा पलावा जंक्शनला नक्की भेट द्या असे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यंना केले आहे. लोकसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. मात्र चुकीच्या कामांना पाठीशी घालणार नाही.  हे राजू पाटील यांनी ट्वीटद्वारे सत्ताधाऱ््यांना सांगितले आहे. आत्ता याचा काय परिमाण होतो हे येणारा काळ ठरविणार आहे. खरेच एमएमआरडीए, केडीएमसी आणि मुख्यमंत्री या मागणीची दखल घेणार का ?

कल्याण शीळ मार्गावर पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी  पलावा जंक्शन येथे उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. हे काम मंद गतीने सुरु आहे. या कामाला गती देण्यासाठी मनसे आमदार पाटील यांनी वारंवार सत्ताधाऱ््यांना लक्ष्य करीत प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पूलाच्या कामाची पाहणी केली होती. पूलाचे काम मंद गतीने सुरु असल्याने एमएमआरडीएच्या अधिकारी वर्गाला चांगले झापले होते. 

त्यानंतर आत्ता मनसे आमदार पाटील यांनी दादर येथील टिळक पुलाच्या कामाचा दाखला देत, दादर येथील टिळक पुलाचे  काम करताना रेल्वे आणि एमएमआरडीए या दोन यंत्रणांनी पुलाचा एका पिलरचा स्प’म ८१ वर्षे जुन्या असलेल्या विष्णू निवास इमारतीला खेटून बांधला आहे.  हे जगातले नववे आश्चर्य आहे. मग दहावे आश्चर्य आमच्या डोंबिवलीत आहे. एमएमआरडीए आणि केडीएमसीच्या कृपेने आम्हीपण या विक्रमाचे मानकरीत आहोत. खरं वाटत नसेल तर डीपी रस्त्यातील अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी पुलाचे आरेखन बदलून एमएमआरडीए आणि केडीएमसीन केलेली करामत पाहण्यासाठी एकदा पलावा जंक्शनला नक्की भेट द्या अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे आमदार पाटील यांनी केली आहे.

Web Title: tenth wonder in dombivli cm eknath shinde should visit palava junction said raju patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.