शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

कोरोना चाचणीसाठी शिक्षकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 01:34 IST

वसंत व्हॅली केंद्र : सेंटरचालकांची तारांबळ, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

n  लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : राज्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू होत असून, शिक्षकांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. त्यामुळे केडीएमसी हद्दीतील शिक्षक चाचणीसाठी सेंटरवर पोहोचले असता तेथे झुंबड उडाल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. तसेच सेंटरचालकांची तारांबळ उडाली. तर, अनेक शिक्षक चाचणी न करताच घरी परतले. मनपा प्रशासनाचे नियोजन नसल्याने शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागला.कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय शिक्षकांना शाळेत हजर केले जाणार नाही. त्यामुळे पश्चिमेतील वसंत व्हॅलीतील सेंटरवर चाचणीसाठी २०० शिक्षकांनी शुक्रवारी सकाळी ७ पासून रांग लावली. मात्र, सेंटरचालक व कर्मचारी ११ वाजता आले. तेथील भली मोठी रांग पाहून त्यांची तारांबळ उडाली. एकेका सेंटरवर दिवसाला फक्त १०० शिक्षकांची चाचणी होऊ शकते. त्यामुळे सर्वच शिक्षकांची चाचणी कशी करणार, असा पेच सेंटरचालकांपुढे उभा ठाकला. गुरुवारीही या सेंटरवर चाचणी न झाल्याने १५० शिक्षकांना घरी परतावे लागले होते. दरम्यान, कोरोनाच्या चाचणीसाठी शिक्षकांकडे केवळ आता दोनच दिवस असून, चाचणी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान केली जाणार आहे.दरम्यान, एका शिक्षिकेने सांगितले की, आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल उशिरा मिळतो. त्यामुळे शिक्षक सोमवारी शाळेत कसे हजर होणार, याविषयी साशंकता आहे. कोरोना चाचणीच्या नियोजनाच्या अभावाचा फटका शिक्षकांना बसला आहे.जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात शिक्षकांनी प्रथम थर्मल स्कॅनिंग करावे. त्यात तापमान जास्त आढळल्यास अगोदर ॲण्टीजेन मग आरटीपीसीआर चाचणी करावी. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास तो शाळा व्यवस्थापनास सादर करून मगच शाळेत हजर व्हावे, असे म्हटले आहे. याच पद्धतीने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढण्यास काय हरकत होती?    - शेखर कुलकर्णी, शिक्षकयेथे करता येईल चाचणीकेडीएमसीने कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालय, वसंत व्हॅली, शहाड येथील साई निर्वाणा, डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय आणि विद्यानिकेतन शाळा येथे चाचणीची केंद्रे सुरू केली आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या