शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पेन्शनसाठी लाक्षणिक उपोषण; कर्मचारी घेणार कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंची भेट

By प्रशांत माने | Updated: June 5, 2024 17:20 IST

२३ मे १९९९ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सुरुवात झाली

प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: केडीएमसीतील परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांना जुनी पेन्शन लागू करा, असे आदेश राज्य सरकारने जानेवारीमध्ये दिले आहेत. परंतु या आदेशाची अंमलबजावणी केडीएमसीकडून होत नसल्याने महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना आता लाक्षणिक उपोषण छेडणार आहे. १३ जूनला  गुरुवारी केडीएमसीच्या मुख्यालयाबाहेर हे आंदोलन छेडले जाणार आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.

२३ मे १९९९ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सुरुवात झाली. गेली पंचवीस वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा उपक्रम चालत आलेला आहे. परिवहन उपक्रमाला महाराष्ट्र शासनाची भविष्य निर्वाह निधी निवृत्ती वेतन १९८२ जुनी पेन्शन योजना लावणे अभिप्रेत होते. परंतु तत्कालीन परिवहन व्यवस्थापक यांनी केंद्र शासनाची अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजना कोणत्याही समितीचा ठराव न घेता आपल्या मनमानी कारभाराने परिवहन कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर रित्या लावल्याचा आरोप संघटनेने केला आहे. परिवहन कर्मचारी हे १९९९ ते २००५ या कालावधीत भरती झालेले आहेत. जुनी पेन्शन संदर्भात महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेने वारंवार प्रशासनाशी पत्रव्यवहार केला परंतु न्याय न मिळाल्यामुळे संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे निवृत्तीवेतन नियम १९८२ जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु याची अंमलबजावणी प्रशासनाने केलेली नाही याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. जुनी पेन्शन योजनेची अंमलबजावणी होणे बाबत येत्या दोन दिवसात याबाबत खासदार शिंदे यांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल पंडित व उपाध्यक्ष आकाश शितकर यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे