शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

आधारवाडी कारागृह जेल अधिक्षक म्हणतात, 'हे' तर खोडसाळपणाचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 16:55 IST

- मयुरी चव्हाण कल्याण - कल्याण येथील आधारवाडी कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण या कारागृहाच्यास्वच्छतागृहात मोबाईल फोन, विद्युत ...

- मयुरी चव्हाण

कल्याण- कल्याण येथील आधारवाडी कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आहे. कारण या कारागृहाच्यास्वच्छतागृहात मोबाईल फोन, विद्युत वायर, स्टील पिन आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सोमवारी  खडकपाडा  पोलीस आणि  आधारवाडीच्या जेल अधिक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी मौन बाळगले होते. मात्र मंगळवारी जेल अधीक्षकांनी "लोकमत"शी बोलताना यावर भाष्य केले आहे. हा प्रकार कोणीतरी मुद्दाम केला आहे. आम्हाला बदनाम करण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केला आहे. हे एक षडयंत्र आहे असा दावा जेल अधिक्षक   ए. एस. सदाफुलें यांनी केला आहे.       शुक्रवारी आधारवाडी कारागृहात कर्मचा-यांनी अचानक पाहणी केली असता एका बॅरेकमधील शौचालयात दोन पाण्याच्या ड्रममध्ये लोणच्याचे भांडं  नजरेस पडले.  जार उघडल्यावर त्यांना त्यात एक मोबाईल फोन, एक इलेक्ट्रिक वायर, 25 ते 30 स्टील पिन, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड आणि सीलंटची दोन पाकिटे सापडल्याचे उघड झाले..याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे.  मात्र खडकपाडा पोलिसांसह, वरिष्ठ अधिकारी तसेच जेल अधिक्षक ए. एस. सदाफुले  यांनी सोमवारी यावर अधिक भाष्य करणे टाळले होते. मात्र मंगळवारी जेल अधिक्षक  सदाफुलें यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

जेल प्रशासनाचा  कारभार सुव्यस्थित सुरू असताना कोणीतरी  मुद्दाम प्रशासनाला बदनाम करण्यासाठी हा खोडसाळपणा केला  असल्याचे ते म्हणाले. तसेच जेल मध्ये असलेल्या गुन्हेगारांपैकी कोणी कोणाला फसवण्यासाठी  हा मार्ग निवडला असेल किंवा प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केला गेला असावा. मात्र प्रशासन सतर्क असल्यामुळेच  ही घटना उजेडात आली.  असा प्रकार पून्हा घडू नये म्हणून आणि याचा  सखोल तपास व्हावा म्हणूनच लागलीच खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सदाफुले यांनी सांगितले. 

मोबाईल व इतर गोष्टी जेलमध्ये पोहचल्याच कशा यावर उत्तर देताना सदाफुलें यांनी सांगितले की  संरक्षक भिंतीवरून कारागृहाच्या आत वस्तू फेकण्याचे अनेक प्रकार यापूर्वीदेखील झाले आहेत. मी आल्यानंतर अधिक कडक लक्ष ठेवून यावर नियंत्रण आणले. त्यामुळे प्रशासनाला अडचणीत आणण्यासाठी हा प्रकार केला गेला आहे . तसेच  याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे ते म्हणाले. 

कारागृहातुन जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल देखील आहे. मात्र या मोबाईल मध्ये कोणतेही सीमकार्ड आढळून आले नाही. मात्र अन्य पर्याय निवडून या मोबाईल द्वारे पोलिसांचा तपास सुरू असून अद्याप यामागे कोण आहे ही बाब निष्पन्न झाले नसल्याची माहिती खडकपाडा पोलिसांच्या सूत्रांनी  दिली. 

टॅग्स :jailतुरुंगkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाPoliceपोलिस