शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांचा 4 वर्षांच्या मुलावर जीवघेणा हल्ला, घेतले १८ चावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 22:43 IST

मुलावर कळवा रुग्णालयात उपचार सुरु

ठळक मुद्देपालकांनी तुषारला डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेते होते. त्याठिकाणी तपासणीकरीता डॉक्टर नसल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण-कल्याण मलंग रोडवरील द्वारली गावात राहणाऱ्या तुषार सुहास निंबोरे या चार वर्षाच्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी काल नववर्षाच्या पूर्व संध्येला जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला आहे. भटक्या कुत्र्यांनी त्याला १८ चावे घेतले आहेत. त्याच्यावर कळवा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे मुलगा भयभीत झाला आहे.

द्वारली गावातील आदित्य इमारतीत राहणारा तुषार हा त्याच्या घराशेजारी काल सायंकाळी खेळत होता. त्याठिकाणी खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. त्याच्यावर हल्ला केला. या हल्याने एकदम गडबडून जाऊन भयभीत झालेल्या तुषारने आरडाओरड सुरु करताना नागरीकांनी तुषारच्या दिशेने धाव घेतली. नागरीकांनी भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून तुषारला सोडविले. तोर्पयत भटक्या कुत्र्यांनी तुषारच्या अंगाला १८ ठिकाणी चावे घेतले होते. त्याच्या पालकांनी तुषारला डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेते होते. त्याठिकाणी तपासणीकरीता डॉक्टर नसल्याची माहिती समोर आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी महापालिकेच्या रुग्णलायात डॉक्टर नसल्याबाबत आरोग्य सोयी सुविधांविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान महापालिका हद्दीत भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे ही बाब या घटनेमुळे पुन्हा एकदा उघड झाली आहे. महापालिका हद्दीत गेल्या नऊ नहिन्यात ९ हजार ४४ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर महापालिका कोटय़ावधी रुपयांचा खर्च करते. मात्र तरी देखील भटक्या कुत्र्यांचे प्रजनन नियंत्रणात आले नसल्याने त्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणdogकुत्राhospitalहॉस्पिटल