शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

चोरीला गेलेल्या दुचाकीचा २४ दिवसांनंतरही शोध लागेना, कागदपत्रंही घेऊन जा, तक्रारदाराचे चोरट्याला आवाहन

By प्रशांत माने | Updated: October 11, 2024 17:34 IST

Dombivli Crime News: चोरीला गेलेली दुचाकी २४ दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना सापडलेली नाही. त्यामुळे आता गाडीची चावी आणि मुळ कागदपत्रे देखील घेऊन जा असे आवाहन संतप्त झालेल्या तक्रारदाराने चोरट्याला पोस्टरद्वारे केले आहे.

- प्रशांत माने डोंबिवली - चोरीला गेलेली दुचाकी २४ दिवसांचा कालावधी उलटूनही पोलिसांना सापडलेली नाही. त्यामुळे आता गाडीची चावी आणि मुळ कागदपत्रे देखील घेऊन जा असे आवाहन संतप्त झालेल्या तक्रारदाराने चोरटयाला पोस्टरद्वारे केले आहे. सीसीटिव्ही कॅमेराचे फुटेज देऊन तसेच वारंवार पोलिस ठाण्यात फे-या मारून सुध्दा पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हे पाऊल उचलल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगरमधील श्रीकृष्णा सोसायटीत राहणारे अभिषेक मधुकर भंडारे यांची दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरीला गेल्याची घटना १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. रात्री पार्क केलेली गाडी सकाळी दिसेनाशी झाल्यावर, अभिषेक यांनी आपल्या नातेवाईकांसह परिसरात शोध घेतला. मात्र, गाडी सापडली नाही. अभिषेक यांनी लागलीच विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर शहरातील १५ ते २० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील त्यांनी पोलिसांना दिले. मात्र तक्रार नोंदवून २४ दिवस उलटून गेले, तरी पोलिसांना दुचाकीचा शोध लावण्यात यश आलेले नाही.

पोलीस ठाण्यात वारंवार फे-या मारूनही गाडीचा थांगपत्ता लावला जात नसल्याने संतप्त झालेल्या अभिषेकने चोराला चक्क गाडीची चावी आणि मूळ कागदपत्रे घेऊन जाण्याचे जाहीर आवाहन पोस्टरद्वारे केले आहे. ‘‘माझी दुचाकी गाडी दिनांक १३ सप्टेंबर २०२४ रोजी चोरीला गेली आहे. आज त्या गोष्टीला २४ दिवस झाले तरीही ती पोलिसांना सापडली नाही. म्हणून मी चोरांना आवाहन करतो की, त्यांनी माझ्या गाडीचे मूळ कागदपत्रं पण घेऊन जावे’’ असे त्यांनी पोस्टरमध्ये नमूद केले आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCrime Newsगुन्हेगारी