शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमध्ये सेनेची नव्याने पक्षबांधणी, जुन्या कार्यकर्त्यांना आणणार प्रवाहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 13:37 IST

Shiv Sena : शहरात शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आल्याची चर्चा सुरू होती. मात्र, माजी नगरसेवक शशिकांत पातकर आणि विभागप्रमुख किशोर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

बदलापूर :  शहरातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शहरात शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात आल्याची चर्चा सुरू होती. मात्र, माजी नगरसेवक शशिकांत पातकर आणि विभागप्रमुख किशोर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. आता पुन्हा एकदा बदलापूरमध्ये शिवसेनेने पक्षबांधणीला सुरुवात केली. मातब्बर पदाधिकारी आणि नगरसेवक निघून गेल्यानंतरही शिवसेनेने आता नव्या कार्यकारिणीच्या नियुक्तीच्या दिशेने काम सुरू केले.निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरे यांना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी विभागप्रमुख किशोर पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी शहरात पुन्हा पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने  कशा प्रकारे काम करायचे व पक्षबांधणी कशी करायची, याबाबत सूचना दिल्या. राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवाहात कसे आणता येईल, तसेच ज्यांना पुन्हा पक्षात यायची इच्छा असेल त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा, अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. 

‘गैतवैभव प्राप्त होईल’शहरात शिवसेनेला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी वसेनेचे विभागप्रमुख किशोर पाटील, माजी नगरसेवक बाळा पातकर, माजी उपनगराध्यक्ष प्रिया गवळी, उपशहर प्रमुख प्रशांत पालांडे, गिरीश राणे यांच्यासह अनेकसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणार, असे निवेदनाद्वारे स्पष्ट केले होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना