शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा ज्या ठिकाणी खासदार, त्या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढविणार- श्रीकांत शिंदे

By मुरलीधर भवार | Updated: June 4, 2023 17:10 IST

कल्याण आणि पालघर मतदार संघात भाजपा खासदारकीसाठी जोर लावत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून रंगल्या आहेत.

मुरलीधर भवार, कल्याण: ज्या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आहे, त्याठिकाणी शिवसेनेचा खासदार निवडणूक लढविणार, असे स्पष्ट शब्दांत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भरसभेत सांगितले. भाजपने मिशन ४५ हा आकडा लोकसभा निवडणुकीसाठी लक्ष्य ठेवला आहे. या ४५ खासदारांच्या मतदार संघात कल्याण लोकसभा आणि पालघर लोकसभेचा समावेश आहे. त्याची जबाबदारी केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांना देण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कल्याण लोकसभा मतदार संघात ठाकूर यांचे दोन दौरे पार पडले आहे. कल्याण लोकसभेवर भाजपचा डोळा आहे. भाजपकडून दावा केला जात आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या विषयी खासदार शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

"कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाले त्याचे नाव घ्या. भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे होत आहेत. ते केंद्राकडून देण्यात आले आहेत, त्यापासून आम्हाला काही त्रास नाही. प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधत आहे. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार. हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे माझे मित्र आहेत ते जेव्हा जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा मी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये," असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

डोंबिवलीतील पाटीदार भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. या प्रसंगी खासदार शिंदे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना उपरोक्त स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.

बॅनर लावल्याने कोणी खासदार होत नाही

कल्याण लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे संपर्क प्रमख माजी आमदार सुभाष भोईर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे बॅनर लावले. ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता त्यातून अधोरेखीत झाली आहे. शिवाय राष्ट्रवादीने कल्याणची जागा ठाकरे गटाला सोडली आहे. यावर खासदार शिंदे यांनी सांगितले की, बॅनर लावून कोणी खासदार होत नाही. प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. विरोधकांशिवाय निवडणूक होऊ शकत नाही. २०१४ साली खासदारकीची निवडणूकीत मी अडीच लाखाच्या फरकाने तर २०१९ सालच्या निवडणूकीत साडे तीन लाख मतांच्या फरकाने निवडून आलो. मतदार संघाच्या विकासाकरीता हजारो कोटी रुपयांचा निधी आणला.

माझे उत्तर कामातून असेल

संजय राऊत यांनी केलेल्या टिकेला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, माझ्यावर टिका करा. माझे उत्तर हे कामातून असेल. आम्ही कधी पातळी सोडलेली नाही. साेडणार ही नाही. महाराष्ट्राची संस्कृती बिघडविण्याचे काम ते करीत असल्याची टिका खासदार शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपा