शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मनसे आमदाराविरुद्ध शिवसेनेनं थोपटले दंड, राजू पाटलांना भरला सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 16:58 IST

मनसे आमदार पाटील यांनी खासदारांनी मंजूर केलेल्या विकास कामासंदर्भात टिका करीत श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत सोशल मीडियावर खोडसाळपणा केला आहे. मनसे आमदारांच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली

ठळक मुद्देराजू पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. त्यांनी त्यावेळेसही काही एक काम केले नाही. आमदार असतानादेखील त्यांनी कोणते भरीव विकास काम केले हे दाखविले पाहिजे. आता कोरोना काळ आहे सुरू आहे, म्हणून आमदार पाटील हे मतदारसंघात दिसत आहेत.

कल्याण - कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यासाठी कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा करुन मंजूरी दिली आहे. याप्रकरणी मनसे आमदारांनी सोशल मिडियावर पत्र फिरविले. त्यात मानपाडा रस्त्याच्या मंजूरी पत्रावर खासदारांचे नाव खोडून स्वत:च्याच नावाचा उल्लेख असलेले पत्र फिरविले आहे. मनसे आमदाराला शिवसेना आता केवळ इशारा देत आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास पोलीस ठाण्यात तक्रार करुन कारवाई करण्याचा सज्जड दम शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिला आहे.     मनसे आमदार पाटील यांनी खासदारांनी मंजूर केलेल्या विकास कामासंदर्भात टिका करीत श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत सोशल मीडियावर खोडसाळपणा केला आहे. मनसे आमदारांच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगरसेवक म्हात्रे यांनी उपरोक्त इशारा दिला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे, युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांच्यासह सदानंद थरवळ, एकनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे, योगेश म्हात्रे, राजेश कदम आदी उपस्थित होते.     रमेश म्हात्रे यांनी सांगितले की, राजू पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. त्यांनी त्यावेळेसही काही एक काम केले नाही. आमदार असतानादेखील त्यांनी कोणते भरीव विकास काम केले हे दाखविले पाहिजे. आता कोरोना काळ आहे सुरू आहे, म्हणून आमदार पाटील हे मतदारसंघात दिसत आहेत. अन्यथा ते दुबई परदेशातील अन्य ठिकाणी असतात, ते लोकांना भेटतात कुठे अशी खोचक टिकाही त्यांनी केली.     युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, मनसे आमदारांचे नाव पाहणी आमदार ठेवले पाहिजे. ते केवळ पाहणी करतात. खासदारांनी जो निधी मंजूर केला. त्याच गोष्टीची माहिती त्यांनी दिली आहे. मंजूर निधीमुळे आमदारांना पोटशूळ उठले आहे अशी टिका प्रकाश म्हात्रे यांनी केली आहे. तर सदानंद थरवळ यांनी सांगितले की, एखाद्या विकास कामासाठी किती पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी खासदार जी मेहनत घेत आहे ते मंजूर निधीवरुन लक्षात येते. आमदारांच्या पत्रला काही एक किंमत नसते. हे मला माहिती आहे. शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की, काम करण्यासाठी सकाळी उठावे लागते अशी टिका राजू पाटील यांच्यावर केली. 

मानपाडा रस्त्याकरीता खासदारांनी 27 कोटी रुपये मंजूर करुन आणले. या रस्त्यासाठी मी स्थायी समिती सभापती असताना 33 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र हा विषय अधिकाऱ्यावर दबाव आणून तत्कालीन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी रोखून धरला होता. आत्ता त्याला मंजूरी मिळाली असता मनसे आमदाराने त्याचे श्रेय घेतले आहे याकडेही रमेश म्हात्रे यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलShiv SenaशिवसेनाMNSमनसेroad safetyरस्ते सुरक्षा