शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी सभापतीपद निवडणुकीवरून शिवसेना-भाजप आमनेसामने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 08:54 IST

उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेने ओमी टीम समर्थक नगरसेवकांना फाेडून महापाैरपद मिळवले.

उल्हासनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीला शासनाने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झाली आहे. महापालिकेत शासनाचा नव्हे तर शिंदेशाहीचा कारभार चालत असल्याचा आरोप भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी केला. तसेच शहर १० वर्षे मागे गेल्याचे म्हटले आहे.उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही शिवसेनेने ओमी टीम समर्थक नगरसेवकांना फाेडून महापाैरपद मिळवले. तर स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व भाजपचे बंडखोर स्थायी समिती सदस्य विजय पाटील यांना सूचक व अनुमोदक दिले. तसेच दुसरे भाजपचे समिती सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांना समिती सदस्याचा राजीनामा देण्यास भाग पाडून पाटील यांना सभापतीपदी निवडून आणले. या वर्षीही स्थायी समितीत भाजपचे बहुमत आहे. मात्र, स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कोरोनाचे कारण देऊन निवडणूक पुढे ढकलली आहे.महापालिकेत बहुमत असताना शिवसेनेने भाजपला शह देऊन सत्ता स्थापन केली. दरम्यान, शिवसेना आघाडीतील रिपाइं पक्षाचे गटनेता व उपमहापौर भाजप गोटात गेल्याने भाजपने शिवसेनेविरोधात आघाडी उभी केली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी, रिपाइंचे गटनेता व उपमहापौर भगवान भालेराव, नगरसेवक राजेश वधारिया, प्रदीप रामचंदानी आदींनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवरून शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर खापर फोडले. महापालिकेवर शासनाचा नव्हे तर शिंदेशाहीचा राज चालत असल्याचा आरोप आमदार कुमार आयलानी यांनी केला आहे.

भाजपचे कोरोना काळात राजकारण - चौधरीशहरातील कोरोना नियंत्रणात आणण्यात सत्ताधारी शिवसेनेला यश आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे रात्रंदिवस आरोग्य व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. तर भाजपचे पदाधिकारी आरोप-प्रत्यारोप करण्यात पुढे आहेत. नागरिकांच्या जिवापेक्षा त्यांना राजकारण करायचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाulhasnagarउल्हासनगर