- सदानंद नाईकउल्हासनगर : स्थानिक नेत्यांनी एकत्र येत शिंदेसेना व ओमी टीमच्या युतीची घोषणा केली. मात्र महापौर पदाचा तिडा निवडणूकीनंतर सोडण्याचे संकेत खासदार श्रीकांत शिंदे यांनी जनसंपर्क कार्यालयात बोलताना दिले. तसेच भाजपा हा महायुतीमधील नैसर्गिक मित्र असल्याचे सांगितले.
उल्हासनगर महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर शहरांत राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. ओमी कलानी यांचे काही समर्थक माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यावर, कलानी गोटात सन्नाटा पसरला. पक्षाला गळती पासून वाचविण्यासाठी ओमी कलानी यांनी शिंदेसेने सोबत युती करण्याची घोषणा स्थानिक नेत्या सोबत केली. रविवारी रात्री खासदार श्रीकांत शिंदे यांनी शहरातील जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी ओमी कलानी यांनी समर्थक नगरसेवकासह खासदार शिंदे यांची भेट घेऊन, दोन्ही पक्षातील युतीबाबत खासदार शिंदे व ओमी कलानी यांनी एकमेकाला पेढे देत आनंद व्यक्त केला. आता युती तर निवडणूकीनंतर महापौर पदाचा तिडा सोडणार असल्याचे संकेत शिंदे यांनी ओमी कलानी यांच्या समक्ष दिली.
साई पक्षाचे जिवन इदनानी व शिंदेसेना एकत्र युवानेते ओमी कलानी पाठोपाठ खासदार शिंदे यांनी स्थानिक साई पक्षाचे प्रमुख जिवंन इदनानी यांच्यासह समर्थकांची भेट पक्ष संपर्क कार्यालयात घेतली. गेल्या महापालिका निवडणुकीत साई पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले होते. तर त्यापूर्वी त्यांनी महापालिका सत्तेची चाबी स्वतःकडे ठेवून, पक्षाला महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आदी महत्वाची पदे मिळवून दिली. साई पक्ष शिंदेसेने सोबत असल्याचे उघड झाले.
पीआरपी शिंदेसेने सोबत गेल्या महापालिका निवडणुकीत पीआरपी कवाडे गटाचे स्थानिक नेते प्रमोद टाले हे नगरसेवक पदी निवडून आले होते. त्यांनी शिंदेसेने सोबत जाणार असल्याचे संकेत देऊन, त्यांनी रविवारी खासदार शिंदे यांची भेट घेतली.
ओमी टिम व शिंदेसेना कार्यकर्त्यात जल्लोष महापालिका निवडणूकसाठी ओमी कलानी टीम व शिंदेसेना यांच्यात युती झाल्याने, दोन्ही पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्याणी जल्लोष केला.