शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वे कोलमडली, पावसाचा फटका! बदलापूर रेल्वे मार्गावर पॉईंट फेल झाल्यानं वाहतूक विस्कळीत

By अनिकेत घमंडी | Updated: September 13, 2022 09:30 IST

लोकल गाड्या विलंबाने धावत असतील तर त्याबाबत प्रवाशांना अवगत करावे, उद्घोषणा यंत्राद्वारे सूचना द्यायला हव्यात मात्र तसे काही होत नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

डोंबिवली : रात्रभर पावसाची रिपरिप सुरू असतानाच बदलापूररेल्वे मार्गावर पॉईंट फेल झाल्याची घटना मध्यरात्री उशिराने घडली. यामुळे लांबपल्याच्या गाड्यांसह लोकल वाहतूक पहाटेपासूनच विस्कळीत झाली आहे. बिघाड शोधून त्याची दुरुस्ती करण्याचे काम पहाटे ५.३० पर्यन्त सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित बिघाडाचा फटका बदलापूर स्थानकातून प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मंगळवारी सकाळी बसला.एरव्ही त्या स्थानकातून सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी निघणारी लोकल यायला विलंब झाला आणि आल्यावर निघायला देखील विलंब झाल्याने स्थानकात तोबा गर्दी झाली होती. गाडीत प्रवेश करण्यासाठी देखील प्रवाशांना खूप त्रास झाला, स्थानकातच गाडी तुडूंब भरल्याने पुढील सर्व स्थानकात त्या लोकलमध्ये प्रवेश करणे अन्य प्रवाशांना शक्य नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.

तसेच लोकल गाड्या विलंबाने धावत असतील तर त्याबाबत प्रवाशांना अवगत करावे, उद्घोषणा यंत्राद्वारे सूचना द्यायला हव्यात मात्र तसे काही होत नसल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती, त्या बिघाडाचा परिणाम सकाळच्या सत्रात उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याने त्या मार्गावरील लोकल सेवा प्रभावित झाल्याने वेळापत्रक कोलमडले.

टॅग्स :badlapurबदलापूरrailwayरेल्वे