समता पार्टी मशाल चिन्हावर दावा करणार, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढवणा

By मुरलीधर भवार | Published: January 18, 2024 06:43 PM2024-01-18T18:43:09+5:302024-01-18T18:43:36+5:30

निवडणूक आयोगाच्या नवीन नोटिफिकेशननुसार निवडणूक आयोगाकडे पक्षा संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली असून मशाल चिन्ह आम्हाला मिळावे यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.

Samata Party will claim the torch symbol, will contest the Lok Sabha elections in Maharashtra on the torch symbol | समता पार्टी मशाल चिन्हावर दावा करणार, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढवणा

समता पार्टी मशाल चिन्हावर दावा करणार, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढवणा

कल्याण- विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना शिंदेचीच असा निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांचा पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी संघर्ष सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा केला आहे. समता पार्टीने मशाल चिन्हाबाबत पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या नवीन नोटिफिकेशननुसार निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या कागदपत्रांची पूर्तता केल्याची माहिती समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी दिली आहे

निवडणूक आयोगाच्या नवीन नोटिफिकेशननुसार निवडणूक आयोगाकडे पक्षा संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली असून मशाल चिन्ह आम्हाला मिळावे यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यावेळी निवडणूक आयोगाने दाद न दिल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे मंडल यांनी सांगितले. मंडल यांनी कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना मंडल यांनी उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीसाठी तात्पुरता स्वरूपात देण्यात आले होते. मशाल हे चिन्ह समता पार्टीचे आहे. मशाल समता पार्टीची ओळख आहे. उद्धव ठाकरे भाड्याची मशाल वापरत असल्याचे मंडल यांनी सांगितले. पार्टीने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे हे मशाल हे चिन्ह आम्हालाच मिळेल. लोकसभा निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्ह त्यांच्याकडून जाणार आहे. ते समता पार्टीकडे येणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मशाल चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Web Title: Samata Party will claim the torch symbol, will contest the Lok Sabha elections in Maharashtra on the torch symbol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.