शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

निर्दयी शिक्षिकेची विदयार्थ्यांना बेदम मारहाण; संतप्त पालकांची शाळेवर धडक, शिक्षिकेचे निलंबन

By प्रशांत माने | Updated: October 13, 2023 18:24 IST

संतप्त पालकांनी आज दुपारी विदयालयावर धडक देत शाळा प्रशासनाला जाब विचारला.

डोंबिवली : निलम भारमल या शिक्षिकेने ३५ ते ४० विदयार्थ्यांना लाकडी पट्टी, स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार येथील पश्चिमेकडील स.है.जोंधळे विदयालय (इंग्रजी माध्यम) या शाळेत घडला. काल मारहाणीचा प्रकार घडला होता. संतप्त पालकांनी आज दुपारी विदयालयावर धडक देत शाळा प्रशासनाला जाब विचारला. पालकांनी विष्णुनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संबंधित शिक्षिकेविरोधात मारहाणीचा गुन्हा नोंद झाला आहे. शाळा प्रशासनानेही शिक्षिकेच्या कृत्याबाबत पालकांची माफी मागत तीचे निलंबन केले आहे.

या मारहाणीत काही मुले जखमी झाली असून त्यांच्या अंगावर मारहाणीचे वळ उठले आहेत. विशेष म्हणजे शिक्षिका भारमल या काही दिवसांपूर्वीच या विदयालयात रूजू झाल्या होत्या. त्या पाचवीच्या विदयार्थ्यांना गणित विषय शिकवायच्या. दरम्यान संबंधित शिक्षिका या नीट शिकवत नसल्याची तसेच विदयार्थ्यांना आरडाओरड आणि मारहाण करीत असल्याची तक्रार पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार मुख्याध्यापकांनी शिक्षिका भारमल यांना समज दिली होती. मुख्याध्यापकांकडे केलेल्या तक्रारीच्या रागातून भारमल यांनी पाचवीच्या अ आणि ब इयत्तेतील विदयार्थी-विदयार्थींनीना बेदम मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

८० मुलांना मारहाण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पालकांनी शाळेवर धडक देत शाळा प्रशासनाला जाब विचारला. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला धारेवर धरले होते. काही दिवसांपूर्वीच रूजू झालेली शिक्षिका भारमल यांच्याबाबत अधिकची माहीती प्रशासनाकडे नव्हती या बेजबाबदारपणाबाबत पालक आणि राजकीय पदाधिका-यांनी अधिकच आक्रमक भुमिका घेतली होती यात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली  पालकांची मागितली माफीदरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही पालकांची माफी मागतो, पुढे अशा घटना होणार नाहीत याची दक्षता घेऊ संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई केल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीSchoolशाळाTeacherशिक्षक