शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये खाण्याअभावी आमच्या मुलांचे हाल, हवालदिल पालकांची आर्त हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 23:48 IST

Russia vs Ukraine War: रशियाकडून अणूअस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याने पालकांमध्ये भीती पसरली आहे. अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडल्याने पालक हवालदिल झाले आहेत

ठाणे - रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अजूनही काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून यामध्ये कल्याण डोंबिवलीती शहरातील 8 विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. आमच्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणा अशी आर्त साद या मुलांच्या पालकांनी दिली आहे.     रशियाकडून अणूअस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याने पालकांमध्ये भीती पसरली आहे. अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडल्याने पालक हवालदिल झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील 54 विद्यार्थ्यांचाही समावेश असून ठाणे शहरातून सर्वाधिक म्हणजेच 22 विद्यार्थी हे युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. तर त्यापाठोपाठ नवी मुंबई 9, कल्याण 6, डोंबिवली 2, भिवंडी 7, मिरा भाईंदर 4 तर अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड आणि वाशिंद येथील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. 

कल्याण डोंबिवलीतील 8 विद्यार्थी उझरोव्ह, भुको विनियन युनिव्हर्सिटी, खारकिव्ह, लविव्ह आणि क्रोप्रिव्हिन्स्कीमध्ये अडकून पडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. इतकंच नाही तर युद्ध सुरू झाल्यापासून या सर्व विद्यार्थ्यांना त्या त्या विद्यापीठाच्या बंकरमध्ये ठेवण्यात आलं आहे, असं मुलांच्या पालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे. अनेकदा खाण्याअभावी या मुलांचे हालदेखील होतं असल्याचं सांगण्यात आलं. मात्र, युद्ध आणखी चिघळण्याच्या आत आमच्या मुलांना भारतात परत आणावं अशी आर्त विनवणी पालक करत आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाthaneठाणेkalyanकल्याणStudentविद्यार्थी