शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

कल्याण-डोंबिवलीत रिक्षांमध्ये कोविड नियम धाब्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 01:19 IST

आरटीओच्या बैठकीत ठरलं तरी काय?; दोनऐवजी तीन प्रवासी

- अनिकेत घमंडीडोंबिवली: रिक्षाचालकांच्या समस्यांसंदर्भात बुधवारी कल्याण येथे आरटीओ कार्यालयात बैठक पार पडली, त्या बैठकीत आता अनलॉकनंतर तीन सीट घेऊन कोविड आधीच्या पद्धतीने शेअर भाडे आकारण्यात यावे यावर चर्चा झाली, त्यास आरटीओ अधिकाऱ्यांनी लेखी मंजुरी दिलेली नाही. परंतु, तरीही प्रत्यक्षात मात्र शेअर असो की स्वतंत्र रिक्षाप्रवासाचे भाडे कमी न करताच दोन ऐवजी सर्रास तीन, चार प्रवासी घेऊन रिक्षावाहतूक सुरू आहे. आरटीओच्या दुर्लक्षामुळे कोविड नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार सुरू आहे.तीन आसनी प्रवास सुरू करावा अशी प्रवाशांची मागणी असली तरीही त्यासोबत भाडेदेखील कमी व्हायलाच हवे, अशी मागणी प्रवाशांची आहे. यासंदर्भात आरटीओ ठोस भूमिका घेत नसल्याने आणि नियमांची कार्यवाही करत नसल्याने समस्या सुटत नसून तिढा वाढत असल्याचे नागरिकांसह रिक्षा युनियन पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रिक्षाचालकांच्या समस्यांसाठी आरटीओ बैठक बोलावते तशी प्रवाशांच्या समस्यांसाठी काय? घेतली नाही? असा सवाल त्रस्त प्रवाशांनी केला. कल्याण, डोंबिवली दोन्ही शहरांत काही रिक्षाचालक प्रवाशांशी उद्धट वर्तन करत असून त्यांच्यामुळे शहरात स्टेशन तसेच मोक्याच्या ठिकाणी वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्यामुळे आरटीओ आणि रिक्षा युनिनयन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेमकं ठरलं तरी काय? त्यातच संभ्रम असल्याने नियमांची पायमल्ली होत आहे.डोंबिवली रेल्वे स्टेशन येथून पूर्वेला गांधीनगर येथे जाण्यासाठी कोरोना आधी स्वतंत्र रिक्षा केली तर २० ते २५ रुपये आकारले जात होते. परंतु, आता ते आकारण्यात येत नसून ४० रुपये, पन्नास रुपयेदेखील मागत असल्याचा अनुभव येत असल्याचे तेजस्विनी महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितले. शेअर पद्धतीने जाण्यासाठी दोन प्रवासी घेत नसून तीन प्रवासीच घेतात आणि भाडे मात्र दहा रुपयांऐवजी २० रुपये प्रत्येकी घेतात, हे काही सगळ्यांना परवडणारे नाही, ही प्रवाशांची लूट असून, कोरोनाचा फटका केवळ रिक्षाचालक घटकाला बसलेला नसून तो सगळ्यांना बसला आहे, याचा विचार केला जाणे गरजेचे आहे.मीटरने प्रवास केला जात नाही म्हणूनदेखील प्रवासी हैराण आहेत. प्रोटेस्ट अगेंस्ट ऑटोवाला (पाम) या प्रवासी संघटनेचे प्रसाद आपटे यांनी सांगितले की ज्या प्रवाशांना मीटरने प्रवास हवा आहे त्यांना मीटर सुविधा मिळत नाही ही शहरांची शोकांतिका आहे. आरटीओ त्याबद्दल काहीच कारवाई करत नाही. वाहतूक पोलीस तक्रार करा, असे आवाहन करतात. सामान्य प्रवासी वाद नको म्हणून त्या विषयात खोलवर जात नाहीत. त्याचा फायदा घेऊन मनमानी सुरू असल्याची  टीका समाज माध्यमांवर होत आहे. लोकल सेवा सगळ्यांसाठी सुरू झाल्यानंतर आमच्या युनियनच्या सर्व सदस्यांना आम्ही तीन सीट घ्या आणि कोविड आधीचे शेअरचे भाडे आकारावे, असे आवाहन केल्याचे लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू काेमासकर यांनी सांगितले. रिक्षाचालकांच्या समस्यांसदर्भात आरटीओ कार्यलयात बैठकीत तीन आसन व कोविडआधीचे शेअरचे भाडे यासंदर्भात चर्चा झाली, त्यानुसार अजूनतरी सगळ्यानी कोविड नियमावलीच फॉलो करावी, असे सांगितले असून वाहतूक पोलिसांसमवेत सर्व्हे करून मग निर्णय घेण्यात येईल.- तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याणआरटीओच्या नियमावलीनुसार आम्ही रिक्षा चालवत आहोत, त्यांनी तीन आसनी व शेअर पद्धतीबाबत नव्याने मार्गदर्शन करावे, आम्ही त्याची अंमलबजवणी करू.- संजय मांजरेकर, अध्यक्ष, रिक्षा संघटनाआरटीओच्या बैठकीत चर्चा झाली. परंतु, त्याची अंमलबजवणी मात्र अद्याप सुरू झालेली नसून ती जबाबदारी आरटीओची आहे.- शेखर जोशी, उपाध्यक्ष, डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटनानुकतीच आरटीओ अधिकाऱ्यांमसवेत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार आम्ही तीन सीट व शेअर पद्धतीने कोविडआधीचे जुने भाडे घेण्याचे आवाहन केले आहे.- दत्ता माळेकर, अध्यक्ष, वाहतूक सेल भाजप कल्याण जिल्हा