शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण: रिक्षाचालक मदतीच्या प्रतीक्षेत; ६० हजारपैकी १० हजार रिक्षाचालकांच्या नोंदीदेखील झाल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 17:00 IST

रिक्षाचालकांचे आधार बँक खात्याशी जोडलेले नाही. कडक निर्बध काळातील १५०० रुपयांच्या मदतीची प्रतीक्षाच. 

ठळक मुद्देरिक्षाचालकांचे आधार बँक खात्याशी जोडलेले नाही.कडक निर्बध काळातील १५०० रुपयांच्या मदतीची प्रतीक्षाच. 

अनिकेत घमंडी कल्याण : कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळात रिक्षा चालकांना १५०० रुपयांचे अर्थसहाय्य राज्य शासन देणार आहे, मात्र त्यासाठी एका इंटरनेट लिंकद्वारे रिक्षाचालकांना आधारकार्डची ओळख गरजेची आहे. मात्र अनेकांचे आधारकार्ड बँक खात्याशी जोडले न गेलेले नाही. त्यामुळे कल्याण आरटीओ समोर ते खात्याशी लिंक करण्याचे मोठे आव्हान असून आतापर्यंत ६० हजार रिक्षापैकी अद्याप १० हजार रिक्षांच्या नोंदीदेखील झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिना अखेरीस उद्दिष्ट असलेल्या ४० हजार रिक्षाचालकांच्या त्या संदर्भातील नोंदी कशा करायच्या? हा मोठा प्रश्न आरटीओ समोर आहे. 

आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण यांनी ही माहिती दिली असून कोणतीही चूक होऊ नये यासाठी त्यांनी आता आधारकार्ड लिंक करण्यासंदर्भात आरटीओ कार्यालयात दोन केंद्रे सुरू केली आहेत. त्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या खात्याशी आधार कार्ड जोडले जाणार आहे. शुक्रवार पासून त्याबाबतचे काम करण्यात येणार होते. त्यासोबतच शनिवार, रविवार दोन दिवसात १० हजारांचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य असल्याचे चव्हाण म्हणाले. आधी सॉफ्टवेअर मिळत नव्हते, तर त्या पाठोपाठ आता ही समस्या समोर आल्याने प्रत्यक्ष रिक्षाचालकांना मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे. 

आधी सुरुवातीला रिक्षा चालकांना ती लिंक मिळत नव्हती, सतत हँग होत असल्याची समस्या भेडसावली होती. त्यामुळे रिक्षा संघटनानी नाराजी दर्शवली होती. या आरटीओ हद्दीत बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, मुरबाड अशी मोठी हद्द आहे, त्यामध्ये येणाऱ्या सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना ती मदत मिळणार आहे. पण त्यात काहींचे परवाना, आधारकार्ड, बँक खाते, लायसन, बँज आदी समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत असून प्रत्यक्ष मदत मिळायला आणखी किती वेळ लागेल हे आताच सांगता येणार नाही असेही अधिकारी म्हणाले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारAdhar Cardआधार कार्ड