शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

कोस्टल रोड, मेट्रो आणि रस्त्यांच्या जाळ्यांचा संकल्प; श्रीकांत शिंदेंचं संकल्पपत्र जाहीर

By मुरलीधर भवार | Updated: May 16, 2024 17:31 IST

Maharashtra lok sabha election 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे आज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत अनावरण करण्यात आले.

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पपत्राचे आज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत अनावरण करण्यात आले. पुढील पाच वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा, रेल्वे, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पर्यावरण अशी विविध महत्त्वाची कामे करण्यावर आपण भर देणार असल्याचे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्याला २०१४ मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्याने, २०१९ मध्ये साडेतीन लाखांच्या मताधिक्याने निवडून दिले. गेल्या १० वर्षांत आपण कल्याण लोकसभेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच गेल्या निवडणुकीत आपण दिलेल्या आश्वसनांपैकी ९० टक्के कामे पूर्ण केली असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले. तर या निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे कार्यकर्ते अतिशय उत्साहाने काम करताना दिसत आहेत. श्रीकांत शिंदे हे आपल्याच पक्षाचे उमेदवार आहेत, अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना झाल्याचे दिसत असून पावलो-पावली त्याची प्रचिती येत असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. 

श्रीकांत शिंदे निवडून आल्यावर नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे काम करतील - आमदार राजू पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यानंतर ज्याप्रमाणे पुढील १०० दिवसांचे कामाचे नियोजन केले आहे, त्याच धर्तीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही काम करतील, असा विश्वास मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच गेल्या १० वर्षात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली विकासकामे कोणीही नाकारू शकणार नाही. आम्हीही विकासकामांबाबत त्यांना सूचना करणार असल्याचे सांगत येत्या निवडणुकीत त्यांना मतदारांनी बहुमताने निवडून देण्याचे आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी केले.

श्रीकांत शिंदे यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी पदवी द्यावी - माजी खासदार आनंद परांजपे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांसह केलेला विकास पाहता त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी पदवी द्यावी, असे गौरवोद्गार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे यांनी काढले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल या माध्यमातून मतदार संघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केल्याचेही आनंद परांजपे यावेळी म्हणाले.

श्रीकांत शिंदे यांच्याकडून लहान लहान प्रश्नही सोडविण्याचे काम - भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी

गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून देश पातळीवरील मुद्द्यांसोबत मतदारसंघातील लहान लहान प्रश्न सोडविण्याचे कामही झाल्याची भावना यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. मतदारसंघातील आरोग्याचा प्रश्न, शिवमंदिर कॉरीडॉर अशा सर्वच कामांना डॉ. शिंदे यांनी न्याय देण्याचे काम केल्याचे सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी खासदार आनंद परांजपे, मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपाचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, शिवसेनेचे कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी, भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, भाजपा कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, आगरी समाजाचे नेते गुलाब वझे, तालुकाप्रमुख महेश पाटील, विधानसभा संघटक बंडू पाटील, विवेक खामकर, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, विकास म्हात्रे, राहुल दामले, नितीन पाटील, शैलेश धात्रक यांच्यासह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे प्रमुख पदाधिकारी तसेच सन्माननीय पत्रकार बांधव उपस्थित होते.

श्रीकांत शिंदे संकल्पपत्राची ठळक वैशिष्ट्ये!

गेमचेंजर प्रकल्प -- कल्याण ते ठाणे कोस्टल रोड- मतदारसंघातील सर्व शहरात मेट्रोचे जाळे- ऍक्सेस कंट्रोल मार्ग- कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प- जलवाहतूक

रेल्वे - रस्ते -- मतदारसंघात उन्नत मार्गांची उभारणी- विविध ठिकाणी उड्डाणपुलांचे जाळे- भूमिगत वाहनतळ आणि बहुमजली वाहन तळ उभारणी- रेल्वेच्या तिसऱ्या चौथ्या मार्गिकेला गती- दातिवली स्थानकात कोकण रेल्वे थांबवण्यासाठी प्रयत्न- दिवा वसई मार्गावर लोकल गाड्या- कल्याण पनवेल लोकल सेवा- कल्याण कर्जत, कल्याण कसारा शटल सेवा.

आरोग्य -- कल्याण लोकसभेत एम्सच्या धर्तीवर रुग्णालय- प्रत्येक शहरात नो कॅश सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी- शासकीय रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सोयी सुविधांची उभारणी

इतर महत्त्वाकांक्षी प्रकल्प -- महिला - तरुण - दिव्यांग - दृष्टीहिनांचे सक्षमीकरण- केजी ते पीजी शिक्षणाची हमी- युपीएससी आणि एमपीएससी केंद्रांची उभारणी, - कल्याण आणि अंबरनाथमध्ये टाटाचे कौशल्य संवर्धन केंद्र- स्टार्टअप उभारणीसाठी महाहाबची उभारणी- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- रेल्वेच्या जागेत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न- बालेवडीच्या धर्तीवर स्पोर्ट्स अकादमी- ग्रामीण भागाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी - मतदारसंघातील अध्यात्मिक आणि धार्मिक ठिकाणांचे जतन- कल्याणात खाडी किनारी वॉटर फ्रंट विकसित करणार- मतदारसंघासाठी स्वतंत्र धरण उभारण्यासाठी प्रयत्न करणार- एकात्मिक शासकीय कार्यालयाची निर्मिती- पर्यावरण रक्षणासाठी विशेष लक्ष

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४