शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

बेकायदा ६५ इमारतीतील रहिवाशांचे मुंबईत धरणे, पालिकेच्या पुन्हा नोटिसा; रहिवासी झाले हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 07:59 IST

महापालिकेच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून बिल्डरांनी ६५ बेकायदा इमारती उभ्या केल्या आणि घरे विकली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीत ‘रेरा’ची फसवणूक करून उभ्या राहिलेल्या ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवाशांना महापालिका प्रशासनाने घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पुन्हा पाठविल्या आहेत. या विरोधात दाद मागण्याकरिता रहिवासी १५ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत.

महापालिकेच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करून बिल्डरांनी ६५ बेकायदा इमारती उभ्या केल्या आणि घरे विकली. महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी तयार करून रेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. वास्तूविशारद संदीप पाटील यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी उच्च न्यायालयाने महापालिकेस तीन महिन्यांच्या आत या इमारती पाडण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी ६५ बेकायदा इमारतीमधील नागरिकांना बेघर होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले. याचिकाकर्ते पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने कायदेशीर नाेटीस बजावली. त्यामुळे पालिकेने पुन्हा रहिवाशांना नोटिसा बजावल्या.  

घरासाठी खर्च केली आयुष्याची जमापुंजी रहिवासी अर्चना बाणकर म्हणाल्या की, त्यांचे सासरे स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांच्या आयुष्याची जमापुंजी घरासाठी लावली. आता तेच घर बेकायदा ठरविल्याने आम्ही जाणार कुठे ? आम्ही करायचे काय, असा सवाल त्यांनी केला.  तर द्रौपदी हायईट्स या इमारतीत राहणारे भावेश शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. त्या पश्चात महापालिकेने पुन्हा आम्हाला घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

मुलीचे शैक्षणिक भवितव्य अडचणीतशिवलीला इमारतीत राहणारे दिनेश देवाडी म्हणाले की, माझी मुलगी इयत्ता पाचवीत शिकते. आम्ही बेघर झालो तर माझ्या मुलीचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत येणार आहे. 

संगीता नायर म्हणाल्या की, माझे पती हयात असताना त्यांनी कर्ज काढून घर विकत घेतले. इमारत बेकायदा असल्याचा धसका घेऊनच माझ्या पतींचे निधन झाले. मला घर रिकामे करण्याची नोटीस महापालिकेने पाठवली. माझे घर जाणार तर बँकेचे हप्ते मी कुठून भरू, असा माझ्यासमोर प्रश्न आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका