शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 05:46 IST

KDMC तील ६५ बेकायदा इमारतींवर लवकरच हातोडा, विधानसभा निवडणुकीमुळे पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने कारवाई करता आलेली नाही. पोलिस बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल.

मुरलीधर भवारकल्याण : खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळविल्याचे भासवून ‘रेरा’ प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविणाऱ्या ६५ बेकायदा इमारती येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करा, असे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनास अलीकडेच दिले आहेत. त्यामुळे या बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या डोक्यावर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.

या प्रकरणातील याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले की, महापालिका हद्दीतील ६५ इमारतींना महापालिकेची परवानगी मिळाल्याचे भासवून बिल्डरांनी ‘रेरा’ प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. ही बाब पाटील यांनीच माहिती अधिकारात उघड केली. त्यानंतर या प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर १९ नोव्हेंबरला सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 

६५ बेकायदा इमारतींवर काय कारवाई करणार, अशी विचारणा केली. महापालिका प्रशासनाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, या ६५ बेकायदा इमारतींना कारवाईची नोटिस बजावली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने कारवाई करता आलेली नाही. पोलिस बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल. त्यावर येत्या तीन महिन्यांत या ६५ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ६५ पैकी ४ बेकायदा इमारती एमआयडीसी हद्दीत येतात. एक इमारत एमएमआरडीएच्या हद्दीत आहे. सहा इमारती पाडण्याची कारवाई केली आहे. चार इमारतींवर अर्धवट कारवाई केली आहे. उर्वरित ४८ इमारतींवर कारवाई होणे बाकी असून, त्यांत नागरिक वास्तव्य करीत आहेत.  

मंजूर आराखडा ४८ तासांत अपलोड करा

राज्यातील प्रत्येक महापालिकेची वेबसाईट महारेरा प्राधिकरणाशी जोडणे आवश्यक आहे. कोणत्याही बिल्डरचा इमारत बांधकाम आराखडा महापालिकेने मंजूर केल्यावर तो ४८ तासांच्या आत महारेराच्या साइटवर अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची घरखरेदीतील फसवणूक टाळणे शक्य होईल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.  

१६ जणांची ५६ बँक खाती गोठवली

६५ बेकायदा इमारतींचे प्रकरण चौकशीत उघड होताच मानपाडा पोलिस ठाण्यात बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून सही, शिक्के, संगणक जप्त केले होते. या प्रकरणी एसआयटी आणि ईडीमार्फत चौकशी करण्यात आली होती. जवळपास १६ जणांची ५६ बँक खाती गोठविण्यात आली होती.

सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

बिल्डरांनी बेकायदा इमारती बांधल्या. त्या इमारतींतील घरे सामान्य नागरिकांना विकली. यात नागरिकांची फसवणूक झाली. त्यांच्या घरावर आता हातोडा चालणार असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान कोण भरून देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. फसवणूक करणारे बिल्डर मात्र मोकाट आहेत. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाHigh Courtउच्च न्यायालय